❀१ ऑगस्ट ❀
*फ्रेंडशिप डे
आज फ्रेंडशिप डे !
त-हाडी
‘फ्रेंडशिप डे’ ऑगस्टच्या महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. या दिवसाची लोकप्रियता पाहता संयुक्त राष्ट्रसंघाने २७ एप्रिल २०११ ला झालेल्या संसदेच्या सभेत आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाची घोषणा केली.
जगभरात साजरा होणाऱ्या ‘फ्रेंडशिप डे’ ला सर्वप्रथम पॅरॅगौरी येथे २० जुलै १९५८ रोजी डॉ.अर्मतेमिओ ब्राचो यांनी सुरुवात केली. डॉ. ब्राचो हे आपले मित्र प्युरटो पिनास्को यांच्या घरी जेवण करण्यासाठी गेले असताना ‘फ्रेंडशिप डे’ च्या अभिनव कल्पनेचा उगम झाला.
संपूर्ण जगभरातील मानव जातीमध्ये मैत्री भावना निर्माण व्हावी यासाठी धर्म आणि वर्णद्वेष न ठेवता ३० जुलै हा दिवस ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करण्यास पॅरॅगौरी येथे सुरुवात झाली. हळूहळू याचा प्रचार, प्रसार होत गेला. भारतात मागील १५ वर्षांपासून मैत्री दिवस साजरा होत आहे.
सुरवातीला एकत्र येऊन मजा करणे इथपर्यंत मर्यादित असलेल्या ‘फ्रेंडशिप डे’ ला आता भेटवस्तू देणे आणि फ्रेंडशिप बँड बांधून हा दिवस साजरा करण्याची पद्धत रूढ झाली आहे. आशिया खंडात अलीकडील काळात ‘फ्रेंडशिप डे’ मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला आहे.
मैत्री दिन संपूर्ण जगभरात पसरवण्यामध्ये सोशल नेटवर्किंग साईट्सचा मोठा वाटा आहे. वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात मैत्रीचे जाळे विणले गेले.
मैत्री म्हणजे सदृढ स्वच्छ काया, जि मित्रावर करते आईप्रमाणे माया !
मैत्री म्हणजे असते एक जागा, गुंतला जाते मित्राचा त्यामध्ये धागा !
मित्र केवळ अलंकाराप्रमाणे सौंदर्य वाढवणारे नसावेत !
स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील
पण आरशाप्रमाणे आपले गुणदोष दाखवणारे मित्र
दैवानेच लाभतात !
– व. पु. काळे –







