• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

प्रामाणिक लोकनेत्याची अखेर !

माणगंगा by माणगंगा
August 1, 2021
in सांगली
0
प्रामाणिक लोकनेत्याची अखेर !

!प्रामाणिक लोकनेत्याची अखेर!


शब्दांकन :- प्रा. आर.एस.चोपडे, अध्यक्ष, अहिल्यादेवी शिक्षण संस्था, सांगली.

      श्री. गणपतराव देशमुख आबासाहेब! एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व! राजकारण, समाजकारण या दोन्ही क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करून जनसामान्यांच्या हृदयात स्थान मिळवलेले अलौकिक व्यक्तिमत्व सांगोला मतदार संघाचे ५० वर्ष प्रतिनिधित्व त्यांनी केले.  जागतिक विक्रम केला. पण राजकारणात ५० वर्षे राहूनही राजहंसाप्रमाणे त्यांनी स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व निर्माण केले. 


राजकारण कशाला म्हणतात याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. त्यांचे व्यक्तिमत्त्व मुळातच लढाऊ होते. स्वातंत्र्य लढ्यामध्ये ही त्यांनी हिरीरीने भाग घेतला. तुळशीदास जाधव यांच्याबरोबर तुरुंगवासही भोगला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सक्रिय होते.

  शे. का. पक्षाचे (१९४८) सुरुवातीपासून अभ्यासू व धडाडीचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी अखेरपर्यंत त्याच पक्षाचे कार्य मोठ्या निष्ठेने केले. राजकीय प्रलोभनांपासून दूर राहून खऱ्या अर्थाने शेतकरी, मजूर, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात त्यांनी रस दाखविला. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सामान्य लोकांचे प्रश्नाला न्याय दिला. त्यामुळे खेडोपाडीच्या,वस्तीवरच्या समाजाशी त्यांचे नाते घट्ट झाले. त्यामुळेच ‘आबा’ नावाची जादू सांगोला मतदार संघामध्ये दिसली. 

    त्यांचे राहणीमान अत्यंत साधे व सात्विक होते. त्यामुळे सर्वसामान्यांना ते जवळचे वाटत. राजकारणातला बडेजाव त्यांनी कधी दाखवला नाही. कोणीही सामान्य माणूस सहज त्यांच्याशी संपर्क साधत असे व आपले काम सांगत असे. आबा आपले काम निश्चित करतील हा विश्वास त्यांनी लोकांच्या मनात निर्माण केला. ‘लोकनेता’ कसा असावा याचा आदर्श म्हणजे ‘आबा’. सामान्य लोकांचे प्रश्न फार मोठे नसतात त्यांच्या सुख-दुःखाची समरस होणे व गरजेचे असते असे ते नेहमी म्हणत. त्यानुसार ते वागत.

 एखाद्या वाडीत एखाद्या लग्नास अथवा दुःखद प्रसंगात आवर्जून ते उपस्थित राहून याचा प्रत्यय देत. त्यामुळे एक प्रकारचा अनामिक ‘जिव्हाळा’ त्यांच्याबाबतीत सर्व जाती धर्माचे माणसांमध्ये होता. जातीभेद  त्यांना शिवला नाही. माणूस कोणत्याही जातीचा व पक्षाचा असो त्यांचे काम करायचे. यासाठी अगदी मामलेदार ऑफिसपासून, मंत्रालयापर्यंत स्वतः त्या व्यक्तीस घेऊन जात असत.  कामाचा पिच्छा पुरविणे  हा त्यांचा पिंड होता. ते विरोधी पक्षनेते झाले, मंत्री झाले. आपल्या भारदस्त, अभ्यासू, भाषणाने त्यांनी अनेकदा सभागृह दणाणून टाकले. सर्व पक्षाचे व गटाचे नेत्यांमध्ये त्यांच्याविषयी आदर होता. सगळेजण त्यांना आदराने वचकून होते.


     आदर्श सूतगिरणी, महिला सूतगिरणी, आदर्श शिक्षण संस्था त्यांनी उभा केल्या व कार्याचा आदर्श भारतभर निर्माण केला. या संस्था पाहणेस देशभरातून लोक येतात.


     क्रांतिवीर नागनाथ अण्णा यांचे बरोबर १९९४ – ९५ पासून त्यांनी ‘पाणी संघर्ष परिषद’ निर्माण करून १३ दुष्काळी तालुक्यांची मोट बांधली व दुष्काळी शेतीस ‘कृष्णा खोऱ्याचे’ पाणी मिळावे म्हणून तीव्र लढा उभा केला. एकूण २६  परिषदा झाल्या. सांगोला तालुक्याचा सहभाग पूर्वीपासूनच लक्षणीय ठरला. या परिषदांचेमध्ये दुष्काळी भागाच्या व्यथा त्यांनी खंबीरपणे, परखडपणे व निर्भीडपणे अनेक वेळा मांडल्या व समाजमन तयार केलेच  पण सरकारलाही या योजना पूर्ण करावयास भाग पाडले

. टेंभूचे पाणी आटपाडी, सांगोल्यास  यावे यासाठी त्यांनी असंख्य वेळा संघर्ष, मोर्चा, घेराव, शिष्टमंडळे नेली. अभ्यासूपणे सभागृहात प्रश्न मांडून सरकारला धारेवर धरले. त्यामुळेच गती मिळून योजना सफल झाल्याचे व दुष्काळी भागात कृष्णेचे पाणी फिरल्याचे चित्र दिसत आहे. अद्याप काम अपुरे आहे. आपण जागे राहिले पाहिजे असे ते वारंवार आपल्या कार्यकर्त्यांना म्हणायचे. आपल्या पक्षाशी अखेपर्यंत ते निष्ठावान राहिले. 


    इतरांच्या सुखाचा विचार आपण केला पाहिजे म्हणजे आपण सुखी होऊ हा धर्माचा खरा संदेश ते जगले. अनेक संस्थांना त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांचे आगमनाने ही कार्यकर्ते तयार होत असत. निस्पृह, निस्वार्थी, निष्कलंक चारित्र्य त्यांनी जपले. म्हणूनच सांगोल्याचे जनतेने त्यांना शेवटपर्यंत हृदयात जपले. आबा गांधीवादी होते. अनेक वेळा आमदार निवासात स्वतःचे कपडे स्वतः धुताना आम्ही पाहिले. अत्यंत साधा आहार, नीटनेटके पांढरेशुभ्र कपडे व सुहास्य मुद्रा यांनी त्यांचे व्यक्तिमत्व उठावदार दिसे.

 त्यांचा खणखणीत व धीरगंभीर आवाज आजही कानात घुमतो. चालण्याचा व्यायाम कधी चुकला नाही. सकाळचा व्यायामाला कधी फाटा दिला नाही. एकदा सहज विचारले “आबा ९४  व्या वर्षी तुमची प्रकृती एवढी फिट कशी आहे त्याचे रहस्य सांगाल का” ते हसत म्हणाले “कसले रहस्य कसले काय! मी दररोज अर्धा तास चालतो. २० मिनिटे व्यायाम करतो अगदी साधा! आहार भाजी-भाकरी झाले रहस्य” आणि खळखळून हस

 !आता ते हास्य दुर्मिळ झाले

आबांना भावपूर्ण श्रद्धांजली!

Views: 946
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
शाहीर लोककलावंत व विविध क्षेत्रातील नामांकित कलावंतांना–कोरोना काळात शासनाने अर्थीक मदत करावी–

शाहीर लोककलावंत व विविध क्षेत्रातील नामांकित कलावंतांना--कोरोना काळात शासनाने अर्थीक मदत करावी--

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)