शाहीर लोककलावंत व विविध क्षेत्रातील नामांकित कलावंतांना–
कोरोणा काळात शासनाने अर्थीक मदत करावी–
वगसम्राट– अनिल बोरसे अंजाळेकर
(भिमा नामा तमाशा मंडळचे लोककलावंत)
::::::::::::::::::::::::::::::::::::::
त-हाडी प्रतिनिधी
यावल तालुक्यातील मौजे अंजाळे येथील शिवशाहीर , वगसम्राट अनिल बोरसे यांनी तमाशा क्षेत्रातील नामांकित लोक कलावंत शाहीर,संगीत भजन, प्रवचन,वाघ्या मुरळी,भजन सम्राट,भारुड, ढोलकी, मृदुंग,हार्मोनियम वादक,भेदीक कलावंत, तबला वादन,जागर , गोंधळी, कवी, लेखक, किर्तनकार, नकलाकार, सहकलाकार, इत्यादी लोककलावंत वर जवळपास दोन वर्षांपासून कोरोणा महामारी मुळे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने विविध प्रकारच्या लोक कला सादर करुन आपल्या कुटुंबाची जबाबदारी व उदरनिर्वाह चालवीतात परंतु संध्या महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोणा सारख्या महामारी मुळे लॉक डाऊन असलेल्यांने कलावंत मंडळी घरीच बसून आहे.
त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना दैनंदिन संसार प्रपंच चालविण्यासाठी अतिशय तारेवरची कसरत करावी लागत आहे.
आपल्या लोककलेतुन समाज प्रबोधन करणा-या विविध क्षेत्रातील नामांकित कलावंतांना मंडळी अतिशय अडचनीचा सामना करीत तेव्हा माय बाप सरकारने आम्हा सर्व कलाकारांना अर्थीक विवंचनेत बाहेर पडण्यासाठी अर्थीक मदत करावी अशी मागणी भिमा नामा तमाशा मंडळाचे वगसम्राट अनिल बोरसे अंजाळेकर
यांनी फेसबुक वाँटसप , युट्युब सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.
सागितले की त्यांनी विविध क्षेत्रातील लोककलावंताचा कलाप्रकार मोबाईल नंबर कलावंतांचे नाव, गाव ,पत्ता, ही सर्व माहिती दिली आहे.
जवळपास दोन वर्षांपासून विविध राष्ट्रीय पुरुषांच्या जयंतीनिमित्त होणारे कार्यक्रम गणपती उत्सव,दुर्गा उत्सव व शासकीय निमशासकीय सर्व कार्यक्रम कोरोणा सारख्या महामारी मुळे लॉक डाऊन व बंद असल्याने जनजागृती करणार्या तमाशा मंडळ बंद आहे लोक कलावंत वर उपासमारी वेळ आली आहे.
तेव्हा माय बाप सरकारने तात्काळ मदत करावी असे त्यांनी दिलेल्या सोशल मीडियावर केली आहे.