म.फुले यांच्या नावाचा पुरस्कार मग तो कोणत्याची क्षेत्रातला असो तो श्रेष्ठच_
मारुती शिरतोडे
विद्येचे अफाट महत्त्व फक्त चारच ओळीच्या सूवचनातून अखिल मानव जातीला सांगून ते कृतीशील पद्धतीने समाज्याच्या अंगी उतरवणारा महिला समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले. या माझ्या बहुजन समाजाला पट्टी पुरते तरी शिक्षण द्या अशी आर्त हाक इंग्रजाकडे करणारा हा महापुरुष आयुष्यभर तळातल्या उपेक्षित जनतेसाठी झटला म्हणूनच म.फुले भारताचा सर्वात महान महापुरुष ठरतो
.त्यांच्या नावाचा शिक्षण क्षेत्रातला पुरस्कार मिळणं ही एक अत्यंत मोठी श्रेष्ठ बाब आहे असे मत परिवर्तनवादी चळवळीतील शिक्षक नेते मारुती शिरतोडे यांनी आज पलूस येथे व्यक्त केले. महात्मा फुले सत्यशोधक गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त, जिल्हा परिषद शाळा आळते येथील उपक्रमशील शिक्षक नितीन चव्हाण यांचा आज पलूस येथे विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख संजय डोंगरे होते. मारुती शिरतोडे म्हणाले की देशाची सत्ता बहुजनांच्या पर्यंत पोहोचवायची असेल तर फुले,शाहू,आंबेडकर आणि मार्क्स यांच्या विचारा शिवाय पर्याय नाही. हेच विचार घेऊन देशपातळीवर काम करणाऱ्या आयटक,सिटू,व अलिकडे प्रोटॉन सारख्या कामगार युनियन मोठे काम करताना दिसून येतात.या संघटना प्रबोधनाबरोबरच कृतिशील लढे ही उभारतात. चालू वर्षी प्रोटॉन युनियन कडून शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला म.फुले, सावित्रीबाई फुले,भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे अशा महामानवांच्या नावाचे पुरस्कार देऊन पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांचे योगदान मोलाचे ठरवले हीच मोठी अभिमानाची बाब आहे.
नितीन चव्हाण सारख्या शिक्षक कार्यकर्ता हा पुरोगामी विचारसरणी डोक्यात घेऊन परखडपणे आपली मते मांडणारा आणि तळागाळातल्या बहुजनांच्या उद्धारासाठी काम करणारा कृतीशील शिक्षक आहे.
नितीन चव्हाण म्हणाले की आज फुले शाहू आंबेडकर आणि मार्क्स यांचा विचार घेऊनच प्रबोधनाची चळवळ पुढे न्यायला हवी.अपग्रेड मुख्याध्यापक महासंघाचे जिल्हाध्यक्ष,वरिष्ठ मुख्याध्यापक राम चव्हाण व शिक्षक नेते मारुती शिरतोडे यांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त नितीन चव्हाण यांचा शाल श्रीफळ व पुस्तक देऊन सत्कार करणेत आला.
यावेळी जिल्हा परिषद शाळा नंबर १पलूसचे वरिष्ठ मुख्याध्यापक व मुख्याध्यापक महासंघाचे जिल्हाध्यक्ष राम चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार निकम,शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी बाळासाहेब खेडेकर ,लक्ष्मण शिंदे ,अनिल कणसे, संतोष खेडकर ,दिव्यांग विभागाचे उपक्रमशील विषयतज्ञ विनोद अल्लाट आदींनी आपले मनोगतातून नितीन चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या. स्वागत व प्रास्ताविक श्री संजय डोंगरे यांनी केले तर आभार श्री संतोष खेडकर यांनी मानले.