रक्त, आणि विचारांच्या वंशजांमूळे आंबेडकर चळवळ दिशाहीन.:- डॉ. राजन माकणीकर
मुंबई दि (प्रतिनिधी) भक्त, रक्त आणि विचारांच्या वंशजांमुळे आंबेडकर चळवळ दिशाहीन झाली असून वेळेत योग्य निर्णय चळवळ वाचवणे गरजेचे असल्याचे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.
तिकिटा साठी व अन्य लाभ किंवा स्वार्थापोटी इतर पक्षाची गोटीगीरी करण्यापेक्षा आंबेडकरी पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मोठा करा आणि सत्तेत स्वतःचे अस्तित्व बनवा तसेच मनुवादाला गाडून टाका, यासाठी सर्व आंबेडकरी विचारांच्या लोकांनी रक्ताच्या वंशजांना एकत्र घेऊन चळवळ वाचवावि असे मतही पँथर डॉ. माकणीकर यांनी व्यक्त केले.
दिशाहीन झालेल्या चळवळीला अर्थपूर्ण करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य होणे गरजेचे असून देशातील सर्व राज्यात डॉ. बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीत उभा केलेल्या उमेदवारांचे वंशज एकत्र करून पक्षाची पुनर्बांधणी करावी तसेच युवा नेतृत्वाला संधी देऊन वरिष्ठ नेत्यांनी फक्त सल्लागार व मार्गदर्शन कमिटी वर कार्यरत राहावे अशी इच्छा ही विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केली.