मनोरुग्ण महिलेला पुनर्वसनासाठी दिव्या फाँडेशन बुलढाणा येथे केले दाखल
सीटि चौक पोलीसांनी व माणुसकी समुहाने केले मदतकार्य
सदर मनोरुग्न महिला ही कलेक्टर ऑफिसच्या परिसरामध्ये खूप धिंगाणा घालत होती वारंवार पोलीस स्टेशनला येऊन कोणावरही तक्रार देणे ही मानसिक आजाराने त्रस्त आहे पोलीस स्टेशन येथे हि खुप धिंगाणा घातला होता ही बाब पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे साहेब यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी महिलेला बऱ्याच वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ती खूप अग्रेसिव्ह आहे. कोणालाही दगड मारणे त्यांच्या मागे पळत फिरणे अशा प्रकारचे कृत्य करते अश्या मनोरुग्णानसाठि काम करणाऱ्या सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेचे व माणुसकी समुहाचे समाजसेवक सुमित पंडित यांना सदर महिलेची माहिती दिली असता त्या महिलेला शासकीय रुग्णालय घाटि येथे प्रथम उपचार करता मनोरुग्न विभागात डॉक्टरना दाखवले होते हे डॉक्टरांनी सांगितले की ती मानसिक आजारी आहे. तिला पुढील वैद्यकीय तपासण्या करून पुनर्वसनासाठी बुलढाणा (वरवंड) येथील दिव्य सेवा प्रकल्प येथे उपचारकामी अन्न वस्त्र निवारा याकरीदा सदर मनोरुग्ण महिलेस दाखल करण्यात आले.सदर महिलेला पोलीसांनी माणुसकी दाखवत न्याय देण्याचा प्रयत्न सिटी चौक पोलीस स्टेशन व माणुसकी समूहाने मदतकार्य केले.
पोलीस निरिक्षक विठल पोटे, उप पोलीस निरिक्षक संगीता गिरी,व दिपक परदेशी,
महिला पोलिस नाईक करुणा वानखेडे,जनाबाई सोनवणे, पोलिस हवालदार प्रमोद पवार,अभिजित गायकवाड,
व माणुसकी समुहाचे समाजसेवक सुमित पंडित,आशोक काकडे,दिव्य सेवा प्रकल्प बुलढाणा, पुजा पंडित,डॉ रंजना प्रशांत दंदे,बन्सी जाधव,
मनोरुग्णांसाठी काम करणे सोपे नाही माणुसकी समुहाची पोलीसांना होतीय मदत….
औरंगाबाद शहरामध्ये पोलीस स्टेशन हद्दीतील बऱ्याच परीसरात मनोरुग्ण भीक मांगनारे मंडळी दोन वेळचे जेवन मीळते म्हणुन बरेचशे लोग घाटि रुग्णालयात आणुन सोडतात.
मग यांच्यासाठी एक मायेचं आपुलकीचं घर आहे का ? यांना असच उकिरड्यावर ठेवायचे काय ? समाजाच दायित्व काहीच नाही का ? हे मनोरुग्ण देखील आधी सामान्य जीवन जगत होते. जीवनात संकट सांगुन येत नसतात.पण ज्या सामाजिक संस्था अशा मनोरुग्णांसाठी काम करतात त्यांना मदत करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी उद्योजकांनी समाजबांधवांनी समोर येणे अत्यंत गरजेचे ठरते. या मदतीतून आपण या मनोरुग्णांचे जीवन अधिक सुसह्य करू शकतो.आणि समाजाची खरी मानसिक विकृती नष्ट होईल.सुमित पंडित करित असलेल्या समाज उपयोगी सेवेसाठी पोलिसांना खुप मोठि मदत होत आहे.
——पोलीस निरिक्षक विठ्ठल पोटे पोलीस स्टेशन सिटी चौक….







