जागतिक रक्तदान दिनानिमित्त व समाजसेवक सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबीराचे आयोजन.
शासकीय रक्तपेढि घाटि रुग्णालयात रक्तदान करणाऱ्या दात्यांची १ महिना २१ दिवस सलुन सेवा मोफत.
सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेच्या स्तुत्य उपक्रम
माणुसकी रुग्णसेवा समूहातर्फे आज दि. १४-०६-२०२३ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य व समाजसेवक सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.समाजसेवक सुमित पंडित यांनी औरंगाबाद शहरातील दानशूर रक्त दात्यां नागरीकांना आव्हान केले आहे. जास्तीत जास्त रक्त दात्यानीं रक्तदान करून गोरगरीबांना मदत करावी, शासकीय रक्तपेढि साठी जे दाते रक्तदान करतील अश्या दात्यांची १ महिना २१ दिवस माणुसकी सलुन तर्फे सलुन सेवा मोफत करण्यात येईल. जास्तीत जास्त दात्यानी,गरजुंना रक्त मिळावे व रक्तदात्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी हा छोटासा प्रयत्न आम्ही करत आहोत..या शिबिराचे उद्घाटन मा.राठोड साहेब वैद्यकीय अधिष्ठाता घाटि यांचे हस्ते आहे.
प्रमुख पाहुणे:- डाँ.आनंद कल्याणकर वैद्यकीय अधिक्षक घाटि,विठ्ठल पोटे पोलीस निरिक्षक सीटि चौक,डॉ.कैलासजी झिने साहेब,माजी आधिक्षक घाटि,प्रशांतजी पोतदार साहेब (पोलीस निरिक्षक सातारा परिसर),घुगे साय्यक पोलीस निरिक्षक,बेगमपुरा पोलीस स्टे,डॉ. प्रगती फुलगीरकर रक्तपेढी प्रमुख,
माणुसकी समुहातील सर्व सभासद,यांच्या हस्ते करण्यात येणार आहे,रक्तदान शिबिर स्थळ:- शासकीय रक्त पेढी घाटी रुग्णालयात अपघात विभागाजवळ औरंगाबाद.
दिनांक १४-०६-२०२३
सकाळी :- ०९:३० ते दुपारी ०२:३० पर्यंत राहिल.
संपर्क :-माणुसकी रुग्ण सेवा समुह टिम व समाजसेवक सुमित पंडित 07588928822,







