अहिल्यापूर विद्यालयात विविध कार्यक्रमांनी नवागतांचे स्वागत
त-हाडी प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील अहिल्यापुर येथील आर.सी. पटेल माध्यमिक विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता पाचवीच्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे औक्षण करून व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले .
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे होते. दहिवद केंद्राचे केंद्रप्रमुख किरण ढिवरे व विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एन. गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत नव प्रवेशित विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन व औक्षण करून स्वागत करण्यात आले,
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांनी प्रतिमा पूजन करून केले.यावेळी मार्च 2023 शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच एस एन पाटील यांच्या माजी विद्यार्थी निलेश परदेशी यांच्या दातृत्वातून शैक्षणिक साहित्याचे हे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक पी एन गोसावी यांनी गेल्या दोन वर्षात विद्यालयाने राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली व शैक्षणिक आलेखाविषयी उपस्थितांना ज्ञात केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांनी शाळेतून जे जे घेतो ते समाजाला देण्यासाठी बांधील असले पाहिजे. ज्ञान हे प्रयत्नपूर्वक आत्मसात करा सोबत विद्यार्थ्यांना घडविण्यात पालकांची ही भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एन. पाटील ,प्रास्ताविक मुख्याध्यापक पी.एन.गोसावी व आभार व्हि.डि कढरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर. एम. जाधव ,ए. एस.गिरासे ,एस. पी. महाजन ,बी ओ वाघ, व्ही. बी.चौधरी ,टी यु कुरेशी डी.व्ही. जावरे, भाईदास कुंभार ,वसंत थोरात, राजू धनगर व भाऊसिंग पावरा यांनी परिश्रम घेतले







