जिल्हा परिषद मराठी व ऊर्दू शाळा धावडवाडी येथे मोफत पाठ्यपुस्तक वाटप व नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम संपन्न!
माणगंगा न्यूज नेटवर्क जत/धावडवाडी:-
शाळेचा पहिला दिवस आणि त्या दिवसाची मजा काही वेगळीचं.तसं पहायला गेलं तर शाळेचा पहिला दिवस हा सर्वांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या दिवसांपैकी एक.नवं दफ्तर,नवी वह्या-पुस्तके,नवे शिक्षक,नवे मित्र सर्वकाही अगदी नवनवं…
१५ जून म्हणजे शैक्षणिक वर्षाची सुरुवात.या अनुषंगाने जिल्हा परिषद मराठी व ऊर्दू शाळा धावडवाडी येथे शासनामार्फत देण्यात येणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तक वाटपाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी शाळेचे शिक्षक श्री.पडळकर सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
या प्रास्ताविकात त्यांनी सांगितले की यावर्षी शिक्षणप्रणालीत बराच बदल झालेला असुन पुर्वी वर्षभर प्रत्येक विषयाला एकच असणारे पुस्तक आता दर तीन महिन्याला वेगळे असणार असुन विषयाला वर्षभरात एकुण चार पुस्तके मिळणार आहेत.तसेच या पुस्तकात प्रत्येक पाठ संपल्यानंतर वहीची काही पाने दिली गेली आहेत.
यावेळी पालक म्हणून आलेले प्रतापपुरचे युवा नेते नवाज शेख यांनी आपले मत मांडताना सांगितले की,गेल्या काही वर्षापूर्वी मोडकळीस आलेली धावडवाडीची शाळा आता कात टाकुन पुढे जात असुन ५वी ला जाणारा विद्यार्थी हा या शाळेतून जाताना परिपूर्ण होऊनच बाहेर पडत आहे.पडळकर सर व नदाफ सर या जोडगोळीचे शैक्षणिक दृष्टीने पंचक्रोशीत नाव गाजत असुन ते प्रामाणिकपणे आपले काम करत आहेत असेही नवाज म्हणाले.
यानंतर ऊर्दू शाळेतही पाठ्यपुस्तक वाटप व नविन विद्यार्थी स्वागत कार्यक्रम पार पडला.यावेळी ऊर्दू चे शिक्षक मुल्ला सर म्हणाले की ऊर्दू भाषा हि शिकायला अत्यंत साधी, सोपी व सहज शिकता येणारी भाषा असुन पाश्चात्य देशांनाही या भाषेचे वेड आहे.या गावात मुस्लिम समाज जास्त असुनही ऊर्दू शाळेचा पट हा फारच कमी आहे अशी खंतही मुल्ला सरांनी व्यक्त केली.
यानंतर कार्यक्रमाची समाप्ति नदाफ सरांनी केली व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमास धावडवाडी गावचे सरपंच आप्पासो आवळे,उपसरपंच युसूफ शेख,ग्रामपंचायत सदस्य अब्दुलकादर मुल्ला,माजी सरपंच चंदूलाल शेख,माजी उपसरपंच यासीन शेख,बंडूलाल शेख,इम्रान शेख,आसिफ शेख,हजरत शेख,सोहेल शेख,कैलास भोसले,नवाज शेख,भिकू शेख तसेच सर्व पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.







