तऱ्हाडी येथे कृषी दिनानिमित्त 15 शेतकऱ्यांना कृषीनिष्ठ आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले
मराठा पाटील बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम
तऱ्हाडी:- २१ जुलै हा दिवस कृषी दिवस म्हणून साजरी करण्यात आला या दिनाचे औचित्य साधून तराडे येथील मराठा पाटील बहुउद्देशीय संस्था यांच्यातर्फे गावातील आधुनिक तंत्रज्ञान व सेंद्रिय खताचा वापर करून विविध पिकांची लागवड करुन उत्पन्नात वाढ केली अशा १५शेतकर यात इंदरचंद लोहार. निर्मलाबाई सोळुंके .अरुण परदेशी. शरद सोनवणे .कैलास करंके. शांतीलाल अहिरे. सचिन पाटील. युरपाबाई सोनवणे सुरेश गोसावी .राजेंद्र पाकळे. गोटू पारधी. चुडामण भील. शिवराम पाटील. किरण भामरे. सागर जाधव यांना कृषीनिष्ठ आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच सुदाम भलकार होते
या वेळी माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर ओंकार दशरथ पाटील.तापी परीसर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे. शेतकरी संघर्ष समिती उपाध्यक्ष तुळशीराम भामरे. मल्हार सेना उपाध्यक्ष सुनील धनगर माजी उपसरपंच अशोक सोनवणे. कृषी पर्यवेक्षक अर्थे मंडळ दिपक पाटील. कृषी सहाय्यक महेंद्र पाटील. ललीत पाटील .एन.एन.महाजन . बोरसे ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील. किरण भलकार .कृषी भूषण पुरस्कार प्राप्त सुदाम करंके. विशाल करंके. किरण अहिरे ज्ञानेश्वर भामरे महेंद्र खोंडे प्रा.दिलवरसिंग गिरासे.अशोक वानखेडे. यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी कृषी पर्यटन दिपक पाटील यांनी कृषी विषयक विविध योजनांचा लाभ घेता येईल असे आवाहन केले या कार्यक्रमाचे आयोजन अशोक वानखेडे रावसाहेब चव्हाण . प्रा.दिलवरसिंग गिरासे .महेंद्र खोंडे. यांनी केले व सुत्रसंचलन ज्ञानेश्वर भामरे आभार रावसाहेब चव्हाण यांनी मानले







