एक रुपयात पीकविमा,विम्यासाठी मुदत ३१ जुलैपर्यंत
शेतकऱ्यांनी लवकर विमा काढा,उर्वरित रक्कम शासन भरणार; कृषी विभागाचे आवाहन
मका,, सोयाबीन, कांदा बियाणे, भुईमूग ,मुग,उडीद, कापूस, सुर्यफुल,आदी पिकांचे करण्यात आले समावेश
त-हाडी
शिरपूर तालुक्यातील व त-हाडी परिसरातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिक विमा काढून घ्यावे असे आवाहन शिरपूर कृषी विभागाने केले आहे.सध्या शेतकऱ्यांनी खरीप पिकाची लागवड केली असून खरी पिकाला संरक्षण मिळावे, यासाठी शासनाने पीक विमा योजना सुरू केलेली आहे.
हा पीकविमा भरल्यानंतर शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झाल्यास संरक्षित असणारी रक्कम मिळणार असून यावर्षीपासून एका पिकाला केवळ एक रुपया पीक विमा भरण्यासाठी एक रुपया लागणार आहे.पीकविमा भरण्याची शेवटची मुदत ३१ जुलै असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला संरक्षित करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना एक रुपया भरल्यानंतर उर्वरित रक्कम शासन भरणार आहे.
शिरपूर तालुक्यात सुमारे ७२ हजार ४३७ हेक्टर क्षेत्र लागवड योग्य आहे. यंदा तब्बल एक महिना उशिरा पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी रिमझिम पावसावर खरिपाची काही शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे.काही शेतकरी आजूक बाकी आहे.दरवर्षी शेतकऱ्याच्या पाठीशी एकापाठोपाठ एक संकटाची मालिका सुरू असून कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ यात शेतकरी भरडला जाऊ लागला आहे.
परंतु यावर्षीपासून शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी जास्त पैशाची तजवीज न करता एका पिकांसाठी केवळ एक रुपया शेतकऱ्यांनी भरावा उर्वरित रक्कम शासन भरणार असल्याने या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. पिकाचे नुकसान झाल्यानंतर विमा रक्कम ही शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात मिळणार आहे.
एका पिकासाठी केवळ एकच रुपया लागत असल्याने जास्तीत जास्त शेतकरी पीक विमा उतरविण्यासाठी पुढाकार घेत आहे. पीक विमा उतरण्यासाठी ३१ जुलै शेवटची तारीख असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा उतरावा असे आवाहन कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी , कृषी सहायक महेंद्र पाटील कृषी पर्यवेक्षक एन महाजन कृषी सहायक ललित पाटील मंडळ अधिकारी, दिपक पाटील मंडळ अधिकारी शिरपूर यांनी केले आहे.
“”शेतकऱ्यांनी शेवटच्या ३१ जुलैच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर पीक विमा उतरवून घ्यावा तसेच पीक विमा व शासकीय नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई-पीक पाहणी मोबाईलद्वारे करणे आवश्यक आहे पिक विम्यासाठी पासबुक झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, सातबारा, आठ अ आणि पीकपेरा पीकविमा भरण्यासाठी अनिवार्य आहे. आजच आपला नजीकच्या महा ई सेवा केंद्र,
सेतू सुविधा केंद्र, येथे जाऊन आपला पिक विमा काढून घ्यावा
कृषी सहायक महेंद्र पाटील
पिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी हिस्सा रक्कम रु १ इतकी नाममात्र असुन त-हाडी वरुळ भटाणे जवखेडा त-हाडकसबे अभानपुर जळोद विखरण भामपुर परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे व आपल्या पिकांचा विमा काढून घ्या
कृषी सहायक एन महाजन
खरीप हंगामात २०२३-२४ करिता पिक निहाय भरावयाचा विमा हप्ता व संरक्षीत रक्कम प्रती हेक्टरी पुढीलप्रमाणे
बाजरी – पीक संरक्षीत रक्कम -३०,०००
मका – पीक संरक्षीत रक्कम – २५,५९८
मुग – पिक संरक्षीत रक्कम – २०,०००
उडीद – पिक संरक्षीत रक्कम – २०,००
भुईमूग – पिक संरक्षीत रक्कम – ४२ ,९७१
कांदा खरीप हंगामात – पिक संरक्षीत रक्कम – ८१ ,४३३
सोयाबीन – पिक संरक्षीत रक्कम – ४९,५००
तीळ- पिक संरक्षीत रक्कम -२५,०००
ज्वारी – पिक संरक्षीत रक्कम -२०,०००
कापुस पिक संरक्षीत रक्कम – २३,०००






