अमर रहे,अमर रहे घोषणासह …. साश्रू नयनांनी मनोज माळी यांना अखेरचा निरोप.
तऱ्हाडी ता.शिरपूर वार्ताहर- वाघाडी (ता.शिरपूर) येथील मूळ रहिवासी सिक्कीम येथे भारतीय सैन्य दलात लान्स नायक मध्ये कार्यरत असलेला जवान मनोज माळी(वय 25) यांचा सिक्कीम येथे पाय घसरुन दरीत पडल्याने मृत्यू झाला.
ही घटना शुक्रवारी (ता.६) घडली. या जवानावर रविवारी (ता. ९) वाघाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. साश्रू नयनांनी त्यांना निरोप देण्यात आला. या वेळी उपस्थितांचे डोळे पाणावले. गावात दोन दिवस चूलही पेटलेली नाही.शहिद मनोज माळी यांचे पार्थिव सिक्कीम येथून विमानाने औरंगाबादला आणण्यात आले. तेथून लष्करी रुग्णवाहिकेतून वाघाडी येथे आणण्यात आले.तसेच त्यांच्या राहत्या घरी त्यांचे पार्थिव आणण्यात आले. शाहिद मनोज माळी यांचे पार्थिव घरी येताच कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. या वेळी धुळे जिल्हा अधिकारी जलत शर्मा खासदार आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल रंधे . बबनराव चौधरी डॉ जितेंद्र ठाकुर, रोहित रंधे जिल्हा परिषद सदस्य सखुबाई पवार सरपंच विजय पवार, उपसरपंच जगदीश कोळी लोटन कोळी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.याप्रसंगी उपस्थितांचे डोळे पाणावले होते. अंत्ययात्रेप्रसंगी देशभक्तिपर गीतांनी वातावरण शोकाकूल झाले होते.
तसेच लष्कराच्या दोन तुकड्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होत्या. महाराष्ट्र पोलिसांचीही तुकडी दाखल होती. त्यांच्यावर सकाळी.१० वाजेच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी लष्कराच्या जवानांनी व पोलिसांनी हवेत तीन- तीन फैरी झाडून मानवंदना दिली.पोलिस तहसीलदार महेंद्र माळी ,पोलीस अधीक्षक .संजय बारकुंड. पोलिस निरीक्षक अंसाराम आगरकर ..सहायक निरीक्षक किरण बारे लष्करातील सुभेदार मेजर मनोज ठाके , निलेश पटेल.औरंगाबादचे लेफ्टनंट सागर कुलकर्णी आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.तसेच सामाजिक व राजकीय.आदींसह तालुक्यातून मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आजी- माजी सैनिक फाउंडेशनचे पदाधिकारी,सरपंच किशोर माळी यांच्यासह सहकाऱ्यांनी तीन दिवस अंत्यसंस्काराच्या तयारीसाठी अथक परिश्रम घेतले. शहिद जवान मनोज माळी यांच्या मागे आई- वडील, भाऊ, असा परिवार आहे. शाहिद मनोज माळी यांच्या मृत्यूने कुटुंबीयांसह गावावर शोककळा पसरली यांनी सूत्रसंचालन केले. शहीद जवानाच्या घटनेमुळे ग्रामस्थांनी दुखवटा व्यक्त केला.पंच क्रोशीतील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते
“मुस्लिम समाजाने शहिद जवान मनोज माळी यांच्या अंत्यसंस्काराला आलेल्या नागरिकांना पाणी व सरबतचे वाटप केले. तसेच मुस्लिम समाजाच्यावतीने शहिद मनोज माळी यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करून हिंदू – मुस्लिम एकतेचा संदेश दिला.”







