पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी वाघडू येथील युवकांना भरतीपूर्व मार्गदर्शन केले
प्रविण अहिरे
वाघडू ता चाळीसगाव येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांची ग्राऊंडची तसेच अभ्यासाची तयारी करून घेण्यासह त्यांना आर्थिक मदतीचे आश्वासन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
वाघडू येथील गावातील स्पर्धा परीक्षा तसेच पोलीस भरती, मिलिट्री भरती व इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या होतकरू मुलांसाठी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले. तरुणांनी कुठलेही भयगंड न बाळगता परीक्षांना सामोरे जावे व यशस्वी व्हावे असा कानमंत्र दिला. यावेळी त्यांनी मुलांच्या अडी अडचणी ऐकून घेतल्या व हसत खेळत वातावरणात मुलांच्या प्रश्नांचे उत्तर दिले व युवकांना ग्रामसुरक्षा दलात स्वामिल होण्याचे आवाहनही केले.
गावात कॅमेरे लावणार
यावेळी पोलीस निरीक्षकांनी गावात व परिसरात चोऱ्या होऊ नये म्हणून वाघडू गावात सीसीटीव्ही बसविण्यात करिता गावकऱ्यांना सीसीटीव्हीचे फायदे समजून सांगितले व लवकरात लवकर गावात मेन मेन स्पॉटला सीसीटीव्ही बसविण्यात यावेत करिता स्वतः आर्थिक मदत करून या उपक्रमास सुरुवात केली. वाघडू गावातील ग्रामस्थांनी व युवकांनी या उपक्रमाचे स्वागत केले यावेळी पोकॉ.समाधान शेनपडू पाटील, समाधान पाटील, सतीश पाटील,संदीप पाटील उपसरपंच राहुल पाटील ग्रा. प. सदस्य बबनराव पाटील भाऊसाहेब पाटील विकास व माजी विकोसो चेअरमन आबासाहेब पाटील पोलीस पाटील गणेश पाटील यांच्यासह गावकरी उपस्थित होेते.







