अहिल्यापूर विद्यालयात लोकसंख्या दिनानिमित्त निबंध स्पर्धा संपन्न
त-हाडी -प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर येथील आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालयात जागतिक लोकसंख्या वाढ नियंत्रण दिनानिमित्त निबंध स्पर्धा संपन्न झाली.
या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटात लहान कुटुंब महान कुटुंब या विषयावर 35 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यातून गिरासे महेश नरेंद्रसिंग (इ. सहावी) प्रथम ,रेवती मनोज गिरासे( इ. पाचवी) द्वितीय, बनकर गौतमी संग्राम (इ. सहावी) द्वितीय, चौधरी नैतिका महेंद्र (इ. पाचवी) तृतीय क्रमांक मिळवला, तर इयत्ता आठवी ते दहावी मोठ्या गटात लोकसंख्या वाढ संधी आणि आव्हाने या विषयावर आधारित स्पर्धेत 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यातून पाटील प्रगती नंदू( इ. दहावी) प्रथम, पाटील दर्शना विजय( इ. दहावी) थोरात प्रियंका दिलीप( इ. नववी ) यांनी संयुक्तपणे द्वितीय मिळवला तर, दर्शन महेंद्रसिंग गिरासे( इ. दहावी) याने तृतीय क्रमांक मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांचा लोकसंख्या वाढ प्रबोधन कार्यक्रमात गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एन.गोसावी तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक आर. एम. जाधव उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण व्ही.डी. कढरे व एस. एन.पाटील यांनी केले.
शा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस. पी. महाजन , ए.एस. गिरासे ,बी. ओ. वाघ ,डी.व्ही. जावरे, पी. एन.मोरे ,टी. यु. कुरेशी. भाईदास कुंभार , भुवसिंग पावरा, राजू धनगर ,किरण देशमुख व वसंत थोरात यांनी परिश्रम घेतले.







