पावसाळ्यात ओले कपडे वापरणे चुकीचे:-डॉ मोहन आर पाटील
त-हाडी
सध्या पावसाळा लागला आहे पावसाळ्यामध्ये रेनकोट छत्री किंवा पावसापासून बचाव करण्यासाठी एखादे साधन नसल्याने ओले होत कामे करावी लागतात. हा प्रकार धोकादायक असून ओले कपडे वापरल्याने फंगल इन्फेक्शन चा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ओले शरीर शक्यतोवर कोरडे करण्यासोबतच आपण वापरत असलेले अंतर्वस्त्रही तत्काळ बदलणेच योग्य असते असा सल्ला तज्ञांकडून दिला जात आहे.
पावसाळ्यामध्ये ओले कपडे वापरू नये
पावसाळ्यात ओले कपडे वापरू नका. तसेच ओले झालेले बूट चप्पल जास्त वेळ पायात ठेऊ नये. योग्य ते खबरदारी घेतल्यास इन्फेक्शन पासून बचाव होऊ शकतो
फंगल म्हणजे त्वचेवर विकृती असणे,
त्वचेवर पुरळ येणे,खाज येणे, अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास ते फंगल इन्फेक्शन असू शकते.
सुती कापड्यांपासून बनविलेले सैल अंडरवेअर घालण्यास सुरुवात करा. फंगल इन्फेक्शन ने संक्रमित व्यक्तींनी वापरलेल्या वस्तू जसे की, टॉवेल,साबण,कपडे यासह इतर साहित्यांचा वापर करू नये
जास्तीत जास्त फंगल हे ओलसर आणि उबदार वातावरणात राहणे पसंत असते. त्यामुळे हा तो शरीराच्या अशा भागावर जास्त पसरतो, जिथे ओलसर आणि उबदारपणा मोठ्या प्रमाणात असतो. .त्यामुळे त्वचा ओली राहू देऊ नका. त्यासाठी त्वचा ही नेहमी कोरडी कशी राहील यावर काळजी घेणे गरजेचे
फंगल इन्फेक्शन हा असा संसर्गजन्य आहे, जो सगळीकडे आढळून येत असतो. जेव्हा एखादी बाह्य बुरशी शरीरातील एखाद्या विशिष्ट भागावर जमा होते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती त्याच्याशी सामना करण्यास सक्षम नसते, तेव्हा ही समस्या उद्भवते.फंगल इन्फेक्शनपासून बचावासाठी वैयक्तिक स्वच्छता पाळणे अत्यंत महत्त्वाची आहे. या शिवाय सुती कपड्यांचे अंतर्वस्त्र परिधान करायला हवे.
फंगल इन्फेक्शन हे शरिरावर ओले कपडे परिधान केल्याने किंवा अधिक उबदार जागेवर उद्भवणारा आजार आहे, त्यासाठी अनेक उपचार देखील उपलब्ध असून फंगल इन्फेक्शन झाल्यास योग्य तज्ञाकडून उपचार मिळून त्यावर नियंत्रण मिळवता येते
तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार सुरु केल्यास इन्फेक्शनपासून लवकरच सुटका मिळविता येते. सुती कपड्यांचे
ओली अंडरवेअर वापरल्याने त्याठिकाणी फंगल तयार होऊन इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात पावसाळ्यात हे प्रमाण अधिक वाढते. त्यामुळे पावसाळ्यात अंगावर ओले कपडे ठेवूच नये. बाहेर कामानिमित्त जायचे आ असेल तर रेनकोट किंवा छत्रीचा वापर करावा. जेणेकरून इन्फेक्शन होणार नाही
डॉ मोहन आर पाटील
साई क्लीनिक त-हाडी







