शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत शिंदखेडा तहसीलचा स्तुत्य उपक्रम ; सर्वत्र अभिनंदन *.
_______________________________
डोंगरगाव ( प्रतिनिधी ) सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र शासनाचा ” शासन आपल्या दारी ” उपक्रमांतर्गत धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील तहसील अंतर्गत स्तुत्य उपक्रम पहावयास मिळत असून सर्वत्र अभिनंदन होत आहे.
धुळे जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार साहेब सिंदखेडा तालुका शिस्तप्रिय तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे साहेब यांच्या आदेशानुसार व सूचनेनुसार शिंदखेडा तालुक्यातील रेशन दुकानदारांनी समाजसेवेचा एक चांगला स्तुत्य उपक्रम राबविला आहे याचे ताजे उदाहरण घ्यायचे म्हटले तर शिंदखेडा तालुका रेशन संघटनेचे अध्यक्ष आर आर पाटील हे दरमहा रेशन वाटप करत असताना गावातील अंध अपंग व आजारी लोकांच्या घरी जाऊन थंब घेऊन आपल्या धान्य वाटप करणाऱ्या व्यक्तीला सोबत घेऊन घरपोच धान्य वितरित करताना दिसून येत आहेत आणि हा आदर्श तालुक्यातील सर्व दुकानदारांना त्यांनी घालून दिलेला आहे
तालुक्यातील रेशन दुकानदार या पद्धतीने पहिलेही काम करतच होते परंतु आता सर्वांनी समाज सेवा हीच ईश्वर सेवा समजावी व अन्नधान्यापासून कोणी वंचित राहू नये भूकबळी होऊ नये म्हणून सर्वांनी आपापल्या गावातील अशा लोकांची सेवा करावी असे आवाहन देखील आर आर पाटील यांनी तालुक्यातील रेशन दुकानदारांना केलेले आहे सध्या तरी धान्य वाटप संदर्भात शिंदखेडा तालुक्यातून शिस्तीचे वातावरण असून मोफत धान्यवाटप सुरू असून कमिशनही तुटपुंजे आहे तरीदेखील रेशन दुकानदार शिस्तीने अन्नधान्य अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वाटप करताना दिसून येत आहेत
या कामी धुळे जिल्हा पुरवठा अधिकारी महेशजी शेलार साहेब शिंदखेडा तालुका शिस्तप्रिय तहसीलदार ज्ञानेश्वरजी सपकाळे साहेब धुळे जिल्हा रेशन संघटना अध्यक्षमधुकर रंगराव पाटील पुरवठा हिशोबी अव्वल कारकून सुभाष बाविस्कर पुरवठा निरीक्षक सुनील मराठे महसूल सहाय्यक गावित मॅडम यांच्या मार्गदर्शन लाभत असून वरील सर्व मंडळींचे व तालुका रेशन संघटना अध्यक्ष आर आर पाटील यांचे त्यांच्या गावी डोंगरगाव. येथे व सर्वत्र अभिनंदन व स्तुती होत आहे







