• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

परमपुज्य यशवंतराव माने युवाविद्यार्थी पुरस्काराचे डाॅ.वसंत मासाळ मानकरी

माणगंगा by माणगंगा
July 17, 2023
in सातारा जिल्हा
0
परमपुज्य यशवंतराव माने युवाविद्यार्थी पुरस्काराचे डाॅ.वसंत मासाळ मानकरी

परमपुज्य यशवंतराव माने युवाविद्यार्थी पुरस्काराचे डाॅ.वसंत मासाळ मानकरी

धीरेन कुमार भोसले दहिवडी:

म्हसवड ता.माण येथील प्रसिध्द डॅाक्टर व नगरसेवक वसंत सावळा मासाळ यांना यशवंतराव माने युवाविद्यार्थी पुरस्कार-२०२३ ने सपत्निक सन्मानित करण्यात आले.

म्हसवडसारख्या नावाजलेल्या नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक म्हणून ते कार्यरत आहेत.ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी म्हणून त्यांनी माणगंगा शैक्षणिक संकुलाची स्थापना केली आहे.यामाध्यमातून आजपर्यंत हजारो विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.माणगंगा क्लिनीकबरोबरच अॅम्बुलन्सची सेवा ते अत्यल्प दरात करतात.कोरोनाच्या महामारीत त्यांनी शेकडो रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याचे काम केले आहे.

यावेळी डॅा.मासाळ म्हणाले,माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना श्री.संत गाडगे महाराज आश्रमशाळेच्या माध्यमातून शिक्षणाच्या संधी दिल्यानेच मेंढपाळाचा मुलगा डॅाक्टर होऊ शकला.मला आश्रमशाळेतून शिक्षणासंदर्भात प्रेरणा मिळत गेली.मी या आश्रमशाळेचा माजी विद्यार्थी असल्याचे आवर्जून सांगितले.म्हसवड सारख्या खेडेगावात माझा जन्म झाला.घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची होती.आई,वडील मोलमजूरी करून आम्हा चार भावंडांना सांभाळत होते.माझे प्राथमिक शिक्षण जि.प.शाळा मासाळवाडीत झाले.माध्यमिक शिक्षणासाठी श्री.गाडगे महाराज आश्रमशाळेत प्रवेश घेऊन दहावीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केले.ज्युनिअर कॅालेजसाठी कर्मवीर भाऊराव पाटील देवापुर तर BHMS वैद्यकीय शिक्षण संगमनेर येथून पुर्ण केले.पुण्यात पुढील शिक्षण व सराव करून २००९ साली म्हसवड येथे माणगंगा क्लिनीक नावाने वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.
गाडगे बाबा,माने बाबांनी जी शिकवण दिली त्यांच्या प्रेरणेतूनच मी समाजसेवा,गावातील अंधश्रद्धा कमी झाली पाहिजे,मुलांना शिक्षण दिले पाहिजे या विचाराने मी हैराण झालो होतो.स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सांभाळत ग्रामीण भागातील मुलामुलींना पॅरामेडीकलचे शिक्षण,डीएमएलटी,रेडीओलाॅजी,स्किल इंडीया नर्सिंग कोर्स सुरु केले आहेत.पहिली ते दहावीपर्यंत संपुर्ण इंग्रजी माध्यमातून शिक्षण सुरू असून समाजकारण व राजकारण करत असताना जनतेचा विश्वास संपादन केला.कोवीडकाळात आ.जयकुमार गोरेंच्या सहकार्याने मोफत आरोग्य सेवा दिल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे संचालक बाळासाहेब माने,क्षीरसागर सर,दिलीप तुपे,हिरालाल काटकर,कृष्णा मदने,सौ.सविता मासाळ यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते.
या सन्मानाबद्दल माढ्याचे खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर,माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह विवीध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या व त्यांचे अभिनंदन केले.

Views: 171
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
आटपाडी तालुक्यातील गावकमगार तलाठ्याला अजब कारभार..बँक जप्तीचा आदेश दुसऱ्याच शेतकऱ्याच्या उताऱ्यावर नोंदवला…

आटपाडी तालुक्यातील गावकमगार तलाठ्याला अजब कारभार..बँक जप्तीचा आदेश दुसऱ्याच शेतकऱ्याच्या उताऱ्यावर नोंदवला…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)