अंबाबारी जिल्हा परिषद केंद्र शाळेत उद्बोधन कार्यशाळा
आज दिनांक 20जुलै रोजी वार गुरुवारी अक्कलकुवा तालुका अंबाबारी केंद्राची विद्या समीक्षा केन्द्र स्तरीय उद्बोधन कार्यशाळा जि प केंद्र शाळा अंबाबारी येथे पार पडली. कार्यशाळेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी आर एम धनगर साहेब उपस्थित होते.अंबाबारी केंद्राचे सन्माननीय केन्द्रप्रमुख श्री सयाजी दादा वसावे साहेब यांनी प्रास्ताविक केले.
तसेच सुलभक म्हणून श्री जगदाळे सर व अमित निकम यांनी विद्या समीक्षा केन्द्र याबाबत माहिती दिली. तसेच स्विफ्टचाट ॲप्लिकेशन कसे वापरावे याविषयी मार्गदर्शन केले. केंद्रातील 100टक्के शिक्षकांनी अतिशय उत्साहाने सहभागी झाले. या ॲप्लिकेशन मध्ये शिक्षक विद्यार्थी हजेरी शालेय पोषण आहार सरल माहिती शाळेच्या संदर्भातील सर्व ऑनलाईन माहिती यामधून उपलब्ध असणार आहे विद्यार्थी स्वाध्याय व शाळेतील गुणवत्ता याबाबतची माहिती केंद्र सरकारला मिळणे सोपे होणार आहे त्याबाबत सर्व शिक्षकांचे ॲप डाऊनलोड करून घेण्यात आले.सदर प्रशिक्षणात सर्व कृती पूर्ण केल्या. शिक्षण विस्तार अधिकारी धनगर साहेब यांनी सविस्तर मार्गदर्शन केले .शेवटी प्रभारी केंद्रप्रमुख श्री पंकज भदाणे सर यांनी सर्वांचे आभार मानले.






