शिंगोर्णी येथे बॅंक ऑफ इंडिया मिनी शाखेचे उद्घाटन संपन्न
नुतन अन्वी इ सेवा केंद्राचे प्रमुख यश पिसे यांनी केले उपस्थित मान्यवरांचे स्वागत….
प्रतिनिधी पिलीव …विश्वजीत गोरड/
माळशिरस तालुक्यातील शिंगोर्णी हे गाव शेवटच्या टोकावर असुन या गावातील लोकांना पैशाची देवान घेवान करण्यासाठी तब्बल बारा किलोमीटर दूर जावे लागत होती. ही लोकांची गैरसोय ओळखुन यश पिसे यांनी बॅंक ऑफ इंडिया कटफळ शाखेच्या अधिपत्याखाली शिंगोर्णी येथे मिनी बॅंक चालु करण्याचा निर्णय घेतला व त्याचे उद्धघाटन कटफळ बॅंक ऑफ इंडिया शाखेचे शाखाधिकारी अजयसिंह पाटील ,शिंगोर्णीचे सरपंच अक्षय धांडोरे,बचेरीचे सरपंच राणी विश्वजीत गोरड निवृत्ती पिसे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी शाखाधिकारी अजय सिंह पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की या शाखेच्या माध्यमातुन वीस हजार पर्यंत आर्थिक व्यवहार तुम्ही कराल त्याबरोबर अपघाती विमा,अटल पेन्शन अशा योजनांचा लाभही आपणास घेता येईल सांगितले यावेळी शिंगोर्णी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब गोडसे,विकास पिसे,अधिकराव माने, बाबासाहेब खंडागळे ,दादा शिकारे, पोलिस पाटील आण्णासो शिकारे,वामन शिकारे शिवराज पुकळे बहुसंख्यक नागरिक उपस्थित होते







