शिरपूर पावसाळ्यात विद्युत पोल व विद्दुत तारेपासून सावधान राहा; दिनेश माळी
त-हाडी प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील व त-हाडी वरूळ भटाणे जवखेडा त-हाडकसबे अभानपुर जळोद भामपुर परिसरातील नागरिकांनी पावसाळ्यात विद्युत अपघारांचा धोका अधिक असतो. त्यामुळे घरगुती, शेतात व सार्वजनिक ठिकाणी
वीजयंत्रणेपासून सावध राहा, असे आवाहन शिरपूर, वरूळ महावितरणचे उपकार्यकारी अभियंता दिनेश माळी यांनी केले आहे. दरम्यान, महावितरण कंपनी कडून येथून पुढे जास्त प्रमाणात पावसाळ्याचे दिवस आहे.पावसाळ्यात मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचा मुख्य स्वीच बंद करावा व शिरपूर व वरुळ महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन उपकार्यकारी अभियंता यांनी दिनेश माळी यांच्या कडून करण्यात आले आहे.
घराच्या किंवा इमारतीच्या मेन स्विचमध्ये व किटकॅटमध्ये फ्यूज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी ऍल्यूमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरावी. ही फ्यूज तार वीजभारानुसार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होतो. तांब्याची एकेरी, दुहेरी वेची तार पयजसाठी वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीज खंडित होत नाही व मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण होते, असे हि उपकार्यकारी अभियंता दिनेश माळी यांनी बोलताना माहिती दिली.
▪️नागरिकांनी अशी घ्या काळजी…
नागरिकांनी विद्युत उपकरणे वापरताना स्वीच बोर्ड असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस किंवा विद्युत उपकरणांना हात लावू नये,ओलसर हातांनी विजेची उपकरणे हाताळू नयेत,
पावसाळ्यात कपडे वाळत घालण्यासाठी लोखंडी तार वापरू नये,घरामध्ये केलेल्या वायरिंगची स्थिती योग्य असल्याची खात्री करून घ्यावी, मिक्सर, हिटर, गिझर, वातानुकूलित यंत्र, फ्रिज इत्यादी उपकरणांसाठी थ्रीपिन सॉकेटचाच वापर करावा,
ओलसर लोखंडी पाइप, कृषिपंपाची पेटी, पाण्याच्या मोटार पंपांला स्पर्श करण्यापूर्वी पायात कोरडी रबरी किंवा प्लॅस्टिक चप्पल वापरावी.अश्या प्रकारे विद्दुत वापरण्ऱ्या ग्राहकांनी काळजी घ्यावी
उपकार्यकारी अभियंता दिनेश माळी शिरपूर व वरुळ







