वरुळ भटाणे त-हाडी परिसरात कृषी विभागाकडून प्रधानमंत्री पिक विमा योजने विषयी शेतकऱ्यांशी संवाद :
त-हाडी: शिरपूर तालुक्यातील त-हाडी वरुळ भटाणे जवखेडा त-हाडकसबे अभानपुर जळोद भामपुर येथील शेतकऱ्यांना आपल्या पालकांपर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेविषयी प्रत्येक शेतकऱ्याना जागृती करून प्रचार आणि प्रसार करण्यात येऊन पत्रक देऊन मार्गदर्शन करण्यात आले
यावेळी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेविषयी माहीती देण्यात आली तालुक्यातील शंभर टक्के शेतकऱ्यांनी या योजनेच्या लाभ घेण्याचे आवाहन कृषी पर्यवेक्षक एन एन महाजन यांनी
कृषी विभागामार्फत प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक विमा योजनेसंदर्भात शेतकऱ्यांना पोहोचवावी यासाठी मंडळ कृषी अधिकारी. आर्थे रविंद्र वसावे शिरपूर तालुका परिसरातील सरपंच उपसरपंच. पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल कृषी सहायक कर्मचारी उपस्थित होते
यावेळी कृषी विभागामार्फत जिल्हा कृषी अधिकारी , कुरबान तडवी साहेब उपविभागीय कृषी अधिकारी ,. बापु गावित तालुका कृषी अधिकारी सी. डी. साठे.यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहायक महेंद्र पाटिल यांनी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा माहिती दिली मार्गदर्शन करताना ऑनलाइन फॉर्म भरतेवेळी ई पिक पाहणी तसेच अन्य कागदपत्रांसंदर्भात येणाऱ्या अडचणींमुळे विलंब होत असल्याचे या शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन स्वयंघोषणापत्र देऊन ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते परंतु ज्या पिकासाठी विमा काढण्यात आला आहे त्याच पिकासंदर्भात ईपीक पाहणी करावी शंभर टक्के शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेच्या लाभ घ्यावा असे आवाहन कृषी पर्यवेक्षक एन एन महाजन यांनी केले
चौकट
पिक विमा अर्ज सादर करते वेळी प्रति अर्ज चाळीस रुपये याप्रमाणे संबंधित विमा कंपनीकडून डाटा ऑपरेटर व सी.एस.सी.सेंटर यांना दिले जाणार आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ विम्याची फी प्रति एकरी एक रुपया एवढीच द्यावी लागणार असल्याची माहिती कृषी सहायक महेंद्र पाटील यांनी दिली आहे.
फोटो – शिरपूर तालुक्यातील भटाणे येथे शेतकऱ्यांना कृषी सहायक महेंद्र पाटील कृषी पर्यवेक्षक एन महाजन कृषी सहायक ललित पाटील कृषी मंडळ अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना







