प्रोत्साहन राशी योजने पासून अजूनही ५३४ शेतकरी वंचित

महात्मा फुले कर्जमुक्ती योजना अंतर्गत नियमित कर्जाचा भरणा करणारे शेतकरी अजूनही प्रोत्साहन राशी योजने पासून वंचित
वरुळ भटाणे जवखेडा त-हाडकसबे अभानपुर जळोद त-हाडीसह परिसरातील शेतकरी योजनापासून वंचित
त-हाडी- महेंद खोंडे
महाराष्ट्र राज्य हे मुख्यत्वे कृषी आधरित असून ८० टक्के जनता ही शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यावर दरवर्षी विविध रोग, दुष्काळ अवर्षन अशी संकटे ओढवतात त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणत नुकसान सहन करावे लागत असे तरीही शेतकरी पीक कर्जाची परतफेड होईल त्या मार्गाने करून शासनाला सहकार्य करीत होते. याच कामाची पावती म्हणून तत्कालीन महविकास आघाडीच्या शासनाने २०१९ मध्ये पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५००००, रुपयांपर्यंत प्रोत्साहन रक्कम महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत देण्याचे जाहीर केले.
या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना अंतर्गत अनेकांना लाभ मिळाला सुधा मात्र योजनेला ४ वर्षाचा कालावधी उलटूनही हजारो शेतकरी प्रोत्साहन योजना पासून वंचित आहे. आघाडी शासनानंतर आलेल्या या शिंदे-फडणवीस शासनाने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच मुख्यमंत्रनी व तत्कालीन अर्थमंत्री आजचे उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंचित शेतकऱ्यांना लवकरच प्रोत्साहन रक्कम देण्यात येईल असे आश्वासन दिले. मात्र आपल्याच आश्वासनांचा विसर मुख्यमंत्री व उपमुख्यंत्री पडलेला पहावयास मिळत आहे.
या योजेनेत पात्र असूनही शेतकऱ्यानं प्रोत्साहन रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झालेला असून शेती कशी करावी, जगायचं कस असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. राज्य सरकार विविध तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांना लाभ देण्याचा घोषणा करते मात्र त्या रोजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचतच नाही.त्यामुळे योजना ह्या कागदावरच आहे की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे.
तेव्हा शासनाने या शेतकऱ्यांना जीवाभावाच्या प्रश्नाचा विचार करून नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरत लवकर लाभ देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यानी केलेली आहे.
प्रतिक्रिया
सदर प्रोत्साहन राशी योजना अंतर्गत शासनाने अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला परंतु अजूनही अनेक नियमित कर्ज भरणारे शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत तेव्हा शासनाने तात्काळ प्रोत्साहन राशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे अन्यथा येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत शेतकरी शासनाला धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही
फोटो सह- तुळशीराम भामरे
शेतकरी स्वाभिमानी संघर्ष समिती शिरपूर तालुका उपाध्यक्ष
प्रतिक्रिया
……आता शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना असून जर नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळाला नाही. तर यापुढे शेतकरी देखील कर्जाची परतफेड करणार नाहीत. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण वाढून सर्व संस्था व बँक अडचणीत येण्याची भीती आहे. प्रोत्साहनपर जाहीर केलेली पन्नास हजाराची मदत शेतकऱ्यांना द्यावी
प्रत्येक वर्षी आम्ही पीक कर्जाचे हप्ते नियमित भरतो. . त्यात राज्य शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळले आहे. नियमित कर्ज भरून आम्ही चूक केली का, भविष्यात कर्जाचे हप्ते भरताना आम्हाला विचार करावा लागेल. सरकारने गांभिर्यांने विचार करून सरसकट कर्जमाफी द्यावी.
फोटो सह -सुभाष पितांबर पाटील
त-हाडी ता शिरपूर जि धुळे







