त-हाडी जि.प. शाळेत स्व.नथ्थु भलकार यांना अभिवादन
त-हाडी-
त-हाडी जिल्हा परिषद शाळेत दानशूर दातृत्व स्वर्गीय नथ्थु सोनजी भलकार यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच उजनबाई वासुदेव अहिरे ह्या होत्या.सदर कार्यक्रमाच्या वेळेस विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून स्वर्गीय भलकार बाबा यांच्या कार्याला उजाळा दिला. स्वर्गीय नथ्थु भलकार यांनी शाळेला आपल्या गावातील मुला मुलींना शिक्षण मिळावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून मोफत जमीन शाळेसाठी दिली होती.
त्यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून मराठा पाटील बहुउद्देशीय संस्था व मराठी ग्रामीण पत्रकार संघ यांच्या तर्फे नंदलाल हेमराज कश्यप, गोकुळ शंकर साळुंखे, हिराजी इंदर गोडसे, रंजीता यशवंत निकुंभे ह्या शिक्षक बंधू-भगिनींना भलकार बाबा यांच्या स्मरणार्थ आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले. ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी सूतगिरणीचे संचालक सुदाम नथ्थु भलकार, तंटामुक्तीचे अध्यक्ष तुळशीराम भामरे, सरपंच जयश्री धनगर, तापी परिसर संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे,माजी उपसरपंच अशोक सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल डांबरे, युवा मल्हार सेना जिल्हा उपाध्यक्ष सुनील धनगर, पोलीस पाटील प्रताप गिरासे, विशाल करंके ग्रामपंचायत सदस्य किरण भलकार, शालेय समिती अध्यक्ष योगेश पाकळे, उपाध्यक्ष बबलू सोनवणे, शशिकांत कदम, सुनील भामरे, भाऊसाहेब भलकार, मराठा कुणबी पाटील बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब चव्हाण, मराठी ग्रामीण पत्रकार संघ उपध्यक्ष महेंद्र खोंडे सचिव डॉ प्रा दिलवर गिरासे, , प्राचार्य नितीन पाटील सर, नरेंद्र दुसाने, मल्हारराव भलकार, पोस्ट मास्तर ताराचंद लोहार, भगवान खोंडे, मुकेश परदेशी, राजेंद्र पाकळे, संजय गुलाबराव भामरे, नरेंद्र सोनवणे, समाधान पाकळे,चिंतामण भलकार, अशोक भामरे, किरण अहिरे, प्रविण लांडगे, युवराज भलकार, मुकेश भलकार कोतिक कदम, शालिग्राम बोरसे , ज्ञानेश्वर भलकार ज्ञानेश्वर सोनवणे, उपस्थित होते. तऱ्हाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष प्रा. उदय भलकार यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक बडगुजर सर व शिक्षक बंधू भगिनींनी परिश्रम घेतले.







