अर्थे बु.ग्रामपंचायत तर्फे ५००वृक्षाची लागवड
तऱ्हाडी:-शिरपूर तालुक्यातील अर्थे बु. ग्रामपंचायत तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला वृक्षारोपण कार्यक्रम अर्थे येथील जिल्हा परिषद मराठी शाळा .ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात. गावातल्या रस्त्याच्या दुतर्फा . घरांच्या शेजारी लिंब. शिसव .आवळा .चिंच. पेरू अशा पाचशे रुपयांची लागवड अर्थे गावाच्या लोकनियुक्त सरपंच मनीषा मनोहर पाटील व गटनेते मनोहर पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला
यावेळी लोकनियुक्त सरपंच मनीषा मनोहर पाटील यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व पावसाची अनिश्चितता व अनियमिता असल्याने वृक्षसंवर्धन करणे आवश्यक आहे म्हणून आज अर्थे ग्रामपंचायतीने गावातील सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला आहे
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद मुख्याध्यापीका कल्पना निकम. सुनीता पाटील. अर्चना कांगणे. ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील दिनेश सनेर .विनोद चव्हाण. राजेंद्र पाटील.आबा चव्हाण. नितीन वारुडे. ग्रामसेवक मनोहर पाटील .शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बिपिन देवरे .कैलास बडगुजर. आबा चव्हाण .मुकेश दोरीक यांच्या उपस्थित गावात वृक्षारोपण करण्यात आले
फोटो –
अर्थे ग्रामपंचायतीने गावातील सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला यावेळी वृक्षारोपण करताना लोकनियुक्त सरपंच मनीषा मनोहर पाटील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ







