एच.आर.पटेल कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरूळ येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ जयंती संपन्न.
त-हाडी
एच.आर.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरूळ येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील एम बी.पाटील होत्या
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष व सर्व शिक्षक बंधु भगिनी यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून माध्यमिक व उच्च माध्यमिक मिळुन दोन गटात वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. ईयत्ता ५ वी ते ७ वी च्या लहान गटातून गुंजन विलास पाटील इ.७वी प्रथम, गुंजन दिलवरसिंग गिरासे ६ वी द्वितीय.तसेच श्रद्धा दिपक गिरासे ५ वी तृतीय क्रमांक मिळविला तसेच मोठा गट ८ वी ते१० वी त्यात प्रियंका दत्तात्रय ईशी ,प्रथम(इ.१०वी ), भावना भगवान पाटील द्वितीय इ.८ वी तर तृतीय क्रमांक जान्हवी संजय भामरे (९वी)व निताक्षी गुलाब कोळी (८वी) यांनी मिळविला व विद्यार्थ्यांनिंनी आपला सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे अध्यक्षा एम बी पाटील यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकून विद्यार्थिनींना लोकमान्य टिळकांच्या गुणांचे आपण अनुकरण कसे केले पाहिजे असे आवाहन केले. प्राचार्य एस एन जोशी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जीवन प्रवास व त्यांनी केलेले समाज प्रबोधन , त्यासोबत त्यांनी लिहिलेल्या कथा, कादंबऱ्या, लोकनाट्य, नाटक इ. लेखन साहित्यातून समाजात परिवर्तन कसे घडवले याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले. विद्यालयातील शिक्षक राकेश मोरे यांनी देखील लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकुन विद्यार्थीनिंना अनमोल असे मार्गदर्शन केले.
वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण वाय डी पाटील व बी एन पाटील यांनी केले. याप्रसंगी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. एम व्ही पाटील प्रा डी एन माळी उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस सी शिंपी यांनी तर आभार प्रा एम व्ही पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी , पी आर मोरे,एस एस पाटील डी टी चित्ते,एन एस म्हस्के,एस एम झटकर रासेयो विद्यार्थिनींचे व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.







