जि प शाळा फत्तेपूर ( फॉ ) शाळेत मेरी मिट्ठी मेरा देश अभियान अंतर्गत . एक मुल एक झाड . अभिनव उपक्रम . :
तऱ्हाडी : जि प . शाळा फत्तेपूर ( फॉ ) येथे मेरी मिठी मेरा देश अभियान अंतर्गत एक मूल एक झाड हा अभिनव उपक्रम घेण्यात आला . कोरोना काळातील ऑक्सिजन गरज ऑक्सिजन अभावी झालेले मृत्यू . नैसर्गिक चक्राचे असंतुलन . तापमानात वाढ हे जनतेस अनुभवास मिळत आहे म्हणुन जि .प . शाळा फतेपूर ( फॉ ) येथे गावात वृक्ष दिंडी काढण्यात आली त्या वेळी विद्यार्थ्यानी डोक्यावर वृक्षाची रोप घेवून वृक्ष . संवर्धनावर एक मूल एक झाड झाडे लावा झाडे जगवा.
वृक्ष लावा दारोदारी समुद्धी येईल घरोघरी .वृक्ष वल्ली संगे सोयरे विविध घोषणा देत विद्यार्थ्यांनी ग्रामस्थाचे लक्ष वेधले जन जागृती केली . नंतर शाळेच्या प्रांगणात व ग्रामपंचायत प्रागंणात जि .प सदस्या कु .अनिता मुखडे व नारायण पवार माजी प .स सभापती संरपच ममताबाई पावरा मंगेश पावरा व बडोदा बॅकेचे मॅनेजर संतोष ठाकरे मुख्याध्यापक किशोर पाटिल ग्रामस्थांनी वृक्षारोपन केले . विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन शिक्षक प्रकाश भामरे ह्यानी माहिती दिली व प्रत्येक मुलाना आपल्या अंगणात शेतात एक झाड लावण्यास रोप दिले .
कार्यक्रमास जि . प सदस्या कु .. अनिता मुखडे सरंपच ममता पावरा .उपसंरपच राजेश पावरा पोलीस पाटिल शांतीलाल मुखडे शाळेचे मुख्याध्यापक किशोर पाटिल शा व्य. समिती अध्यक्ष सुरेश चव्हाण . शिक्षक लुकेश गावीत . कृष्णा अहिरे व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन सूत्रसंचलन प्रकाश भामरे आभार प्रदर्शन लुकेश गावीत सरानी केले .







