• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

अहिल्यापूर च्या विद्यार्थ्यांना लालपरीचा आधार …. शाळा स्थापनेनंतर तांडे ते अहिल्यापूर बस धावणार

माणगंगा by माणगंगा
August 12, 2023
in महाराष्ट्र
0
अहिल्यापूर च्या विद्यार्थ्यांना लालपरीचा आधार …. शाळा स्थापनेनंतर तांडे ते अहिल्यापूर बस धावणार

अहिल्यापूर च्या विद्यार्थ्यांना लालपरीचा आधार …. शाळा स्थापनेनंतर तांडे ते अहिल्यापूर बस धावणार


अर्थे प्रतिनिधी


शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर येथील आर.सी. पटेल माध्यमिक विद्यालयात शाळा स्थापनेनंतर तांडे ते अहिल्यापूर राज्य परिवहन महामंडळाची बस सुरू करण्यात आली त्या बसफेरीचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.


राज्य परिवहन महामंडळाची बस विद्यार्थ्यांना घेऊन शालेय प्रांगणात आल्यानंतर शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॕ. उमेश शर्मा , राज्य परिवहन महामंडळ शिरपूरचे वाहतूक नियंत्रक मनोज पाटील, वाहतूक नियंत्रक जिभाऊ धनगर, अहिल्यापूरचे सरपंच संग्रामसिंग राजपूत, असली तांडे धनपूर गावाचे सरपंच पांडुरंग धनगर , उपसरपंच सुनील कोळी, शिरपूर पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर मंगळे तांडे येथील महेंद्र मंगळे, मुख्याध्यापक पी. एन. गोसावी यांच्या उपस्थितीत राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे पूजन करून वाहन चालक चौधरी व वाहन वाहक शिरसाठ यांचे औक्षण करण्यात आले.

त्यानंतर अहिल्यापूरचे सरपंच संग्रामसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेत मान्यवरांच्या शुभहस्ते अहिल्यादेवी होळकर मुलींची मोफत पास योजनेच्या लाभार्थी मुलींना पास वितरित करण्यात आल्या. यावेळी वाहतूक नियंत्रक मनोज पाटील यांनी राज्य परिवहन मंडळाच्या विविध योजनांची माहिती सांगून विद्यार्थ्यांना प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले ,तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा यांनी राज्य परिवहन मंडळ म्हणजे समाज व्यवस्थेचे जीवनवाहिनी असल्याचे सांगितले.

समाजातील शेवटच्या घटकाला विद्यालयात आणण्याचे काम एस. टी. बस करत असल्याने विद्यालयाने त्या योजनांचा लाभ घेतला. त्यामुळे विद्यालयात सुरू असलेल्या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संग्रामसिंग राजपूत यांनी ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाच्या व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्य परिवहन महामंडळाचे कौतुक केले . या कार्यक्रमात मुख्याध्यापक पी. एन. गोसावी यांनी प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एन पाटील यांनी केले यांनी उपस्थित त्यांचे आभार व्यक्त केले.

अहिल्यापूर येथील विद्यालयात तांडे ,धनपूर, अमरीशभाई नगर, सूतगिरणी येथील विद्यार्थी मिळेल त्या वाहनाने पायपीट करून आर्थिक पदरमोड करून शाळेत येऊन शिक्षण घेत होते संबंधित गावाला कोणत्याही प्रकारच्या प्रवासी वाहन सुविधा नसल्याने खाजगी वाहनात प्रवास करणे विद्यार्थ्यांना गरजेचे होते परंतु पालकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेक मुलं शाळेला दांडी मारून विद्यालयात गळतीचे प्रमाण वाढत होते.

विद्यार्थ्यांची गळती व आदिवासी वाड्या वस्त्यांवरील मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबविण्यासाठी विद्यालयाने वेळीच नियोजन करून बस सुरू केल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले. मुख्याध्यापक पी. एन. गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी प्रयत्न करून तांडे ते अहिल्यापूर ही राज्य परिवहन महामंडळाची बस सुरू केली. तांडे ते अहिल्यापूर ही राज्य परिवहन मंडळाची बस सुरू झाल्याने शैक्षणिक गुणवत्ता विकास करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना लाल परीचा आधार मिळणार आहे.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख आर. एम. जाधव बी. ओ. वाघ यांच्यासह एस. पी. महाजन, डी. व्ही.जावरे , ए.एस. गिरासे, टी.यु.कुरेशी, पी.एन. मोरे ,भाईदास कुंभार ,बुरसिंग पावरा, राजू धनगर ,वसंत थोरात व किरण राजपूत यांनी परिश्रम घेतले.

Views: 137
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
जिल्हा परिषद मराठी त-हाडी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप…,

जिल्हा परिषद मराठी त-हाडी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप…,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)