*संगणक परीचालकांचा शिरपुर पंचायत समितीसमोर काळी फीत लाऊन निदर्शने
त-हाडी ता १४
ग्रामपंचायत हिप्परगाथडी तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील संगणकपरिचालक अंबादास नागोराव पेटेकर यांनी csc -spv कंपनीने नाहक दिलेले टार्गेट,कामा व्यतिरिक्त लावण्यात येणारे इत्तर कामे,तसेच ग्रामपंचायत स्तरावर कामावरुन कमी करण्याच्या दिलेल्या धमक्या,राज्य शासन संगणकपरिचालकांचा निर्णय घेण्यास करत असलेली टाळाटाळ या सर्व प्रकारामुळे होणारा मानसिक त्रास व दबावामुळे ०९ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री १० च्या सुमारास हिप्परगाथडी गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्या सर्व दोषीवर गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक करावे या मागणीसाठी राज्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयासमोर सोमवारी १४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०. वाजता काळ्या फिती लावून सर्व संगणकपरिचालक निदर्शने करत असुन त्या अनुशंगानेपंचायत समिती शिरपुर कार्यालयासमोर यशिरपुर तालुक्यातील संगणक परीचालकांनी काळी फीत लाऊनहनिदर्शने केली तसेच सदरह प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करत गटविकास अधिकारी संजय सोनवणे यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी संगणक परीचालक संघाचे अध्यक्ष तुषार पाटील,जिल्हा सचिव जितेंद्र राजपुत,माजी अध्यक्षीय महेंद्र कोळी,सुशील पवार,दादाभाई महीरे,गौरव पाटील,महेंद्र ढीवरे,दीनेश पाटील व संघटनेचे पदाधिकारी उपस्थीत होते.
फोटो-शिरपुर पंचायतों समीती कार्यालया समोर काळी फीत लाऊन निदर्शने करतांना ,जिल्हा सचिव जितेंद्र राजपुत,माजी अध्यक्षीय महेंद्र कोळी,सुशील पवार,दादाभाई महीरे,गौरव पाटील,महेंद्र ढीवरे,दीनेश पाटील व संघटनेचे पदाधिकारी







