एच आर पटेल कन्या माध्य व उच्च माध्य.विद्या.वरूळ येथे ७७वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरात-
हाडीतालुक्यातील वरूळ येथिल एच आर पटेल कन्या विद्यालयात देशाचा ७७वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.. प्रसंगी वरूळ गावचे प्रथम नागरिक सरपंच नरेंद्रजी मराठे, माजी सरपंच तात्यासाहेब किसन मराठे, एकनाथ जी बोरसे, पोलिस पाटील श्रीमती प्रतिभाताई मराठे, प्रमोदभाई पटेल माजी सैनिक कृष्णा छगन कोळी,लकडु देवमन कोळी, शालेय व्यवस्थापन समिती चे पदाधिकारी तसेच वरूळ गावच्या पंचक्रोशीतील नागरिक विद्यालयाचे प्राचार्य एस एन जोशी,आर सी पटेल इंग्रजी प्राथमिक विद्यालयाच्या प्राचार्या सपना मराठे तसेच सर्व शिक्षक बंधु भगिनी उपस्थित होते
प्राचार्य एस एन जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.प्रसंगी मागील वर्षी २०२२-२३मध्ये ई १० व १२ वी इयत्तेत प्रथम आलेल्या विद्यार्थीनिंना संस्थेचे आश्रयदाते स्वर्गीय पप्पाजी रसिकलालजी पटेल यांच्या स्मरणार्थ बक्षीस देण्यात आले.प्रसंगी देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा घेण्यात आली व विद्यार्थीनींनी हिरीरीने सहभाग घेतला..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस सी शिंपी व राकेश मोरे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधु भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी बंधु यांनी परीश्रम घेतले.







