भोरखेडा विद्यालयात सैनिकांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण
त-हाडी
आर सी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ७६ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला. प्रथम ध्वजपूजन पोलीस निरीक्षक निलेश आधारसिंग राजपूत यांनी केले व भारतीय लष्करातील सैनिक गोविंदा समाधान शिरसाठ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
यावेळी प्राचार्य आर एफ शिरसाठ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील पर्यवेक्षक सी जी पाटील पंचक्रोशीतील जेष्ठ नागरिक,पदाधिकारी, पालक मोठया संख्येने उपस्थित होते यावेळी संस्थेच्या वतीने व रघुनाथ भिलेसिंग जमादार यांच्या कडून इयत्ता १० व १२ वीत प्रथम क्रमांक प्राप्त साई हेमराज पाटील व मिनाक्षी जाधव यांना बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली तसेच अमृत महोत्सव समारोप व मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच गरजू विद्यार्थ्यांना शिक्षक व सचिन राजपूत यांच्या कडून गणवेश वाटप करण्यात आले क्षेलसिंग राजुसिंग राजपूत यांच्या कडून सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले सूत्रसंचालन एस आर देसले यांनी मानले तर आभार एन वाय बोरसे यांनी व्यक्त केले यावेळी एन डी चव्हाण, डी आर राजपूत, आर जी पाटील, एम जी वाडीले,पी एस परदेशी,व्ही बी शर्मा,एस एस निकुभे, मिना पटेल, दिपाली निकम,एस एम पाटील,पी टी चौधरी, व्ही एस ईशी,व्ही डी पाटील,रुपाली तिरमले,ऐश्वर्या मोरणकर, जे डी पाटील,तुषार पाटील, सुनील पावरा, चंदन पावरा,आफ्रिद पटेल,शाम जाधव सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते







