घरनिकीत डॉ. प्रतापसिंह बेरगळ बहुद्देशीय संस्थेमार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान-:
आटपाडी प्रतिनिधी
घरनिकी ता. आटपाडी येथे डॉ. प्रतापसिंह बेरगळ बहुद्देशीय संस्थेमार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
15 ऑगस्ट रोजी भारताच्या 77 व्या स्वतंत्रता दिनाचे औचित्य साधून 5 वी ते 9 वी पर्यंत प्रथम तीन क्रमांकाच्या व इ 10 वी च्या प्रथम पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, प्रमाणपत्र, वही देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच जिल्हा परिषद शाळा व न्यू हायस्कूल च्या सर्व विद्यार्थ्यांना वही व खाऊ वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत च्या वतीने ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर हा कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्षा डॉ भूमीकाताई बेरगळ व उपाध्यक्ष पवनकुमार बेरगळ यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ आप्पासाहेब पाटील, सदस्य सत्यवान पिंजारी, घनश्याम बेरगळ, दीक्षा बेरगळ व दत्तात्रय पुकळे तसेच घरनिकी ग्रामपंचायत चे सरपंच हेमंत पवार, उपसरपंच शांताबाई माने, ग्रा प सदस्य अप्पासो पवार, विक्रम दाईगडे, यास्मिन जावेद काझी,विद्या पवार, सुभाष कोळेकर, कोयनाबाई दडस, आबासो बेरगळ, नारायण भाऊ पवार, सलीम शेख, शहाजी पवार, शिवाजी येळे इ मान्यवर उपस्थित होते.
यासाठी न्यू हायस्कूल घरनिकी चे मुख्याध्यापक शिवाजी चव्हाण , व जिल्हा परिषद शाळा घरनिकी चे मुख्याध्यापक सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.







