कैःमाधवराव भामरे शैक्षणिक,सांस्कृतिक सामाजिक व विधायक समिती त-हाडी यांच्याकडून शैक्षणिक शालेय साहित्य वाटप
ज्ञान दान हेच श्रेष्ठ ज्ञान असल्याचे डॉ प्रा वनमाला पवार याचे प्रतिपादन
त-हाडी (प्रतीनीधी) शिरपुर तालुक्यातील त-हाडी येथे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत स्व माधवराव भामरे शैक्षणिक सांस्कृतिक विधायक समिती तर्फे गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले
त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथील
अधिव्याख्याता डॉ . वनमाला पवार होत्या . तर प्रमुख अतिथी म्हणून स्व माधवराव भामरे सांस्कृतिक विधायक समिती अध्यक्ष प्रकाश भामरे, मल्हार सेना धुळे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल धनगर तंटामुक्त अध्यक्ष तुळशीराम भामरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश पाकळे माजी चेअरमन संजय जाधव, रेल्वे पोलिस युवराज जाधव कृषी मित्र किरण भामरे मराठा कुणबी पाटील बहुउद्देश संस्था अध्यक्ष रावसाहेब चव्हाण माजी शालेय व्यवस्थापन समिती उपध्यक्ष जितेंद्र खोंडे उपस्थित होते यावेळी शाळेतील गरजु विद्यार्थ्यांना पाटी, पेन्सिल ,सचित्र, बालमित्र, इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले त्यावेळी डॉ . वनमाला पवार यांनी प्रकाश भामरे यांनी संस्थेकडून होत असलेल्या कार्याचे कैतुक केले .
गोरगरीबाची सेवा हिच श्रेष्ठ सेवा आहे . पाटी व पेन्सिल सचित्र बालमित्र वह्या व पेन अशा अनेक शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आंनद व उभारी देण्याचे पवित्र काम दूसरे कोणते असुच शकत नाही असे डॉ . वनमाला पवार यांनी नमूद केले या वेळी शाळेचे मुख्याध्यापक अशोक बडगुजर शिवागी देवरे रंजिता राठोड सुलोचना चैधरी मोनिका बडगुजर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवागी देवरे यांनी व आभार प्रदर्शन बडगुजर यांनी मानले







