त-हाडी गावातील वीज समस्याचे भयानक वास्तव
झाडींच्या गर्दीतील ट्रान्स्फार्मर देताय मृत्यूला आमंत्रण
वीज वितरण कंपनीकडून फक्त बिल वसुली मात्र सुविधाचा वानवा
त-हाडी
शिरपूर तालुक्यात त-हाडी गावातील असणाऱ्या विजेचे जाळे आणि त्यासाठी उभारण्यात आलेले ट्रान्सफार्मर यांचे भयाण वास्तव समोर आले असून गर्द झाडी, झुळपे काडेरी ,काडेरी झुळुप उभे असलेले ट्रान्सफार्मर हे नागरिकांच्या जिवाला आमंत्रण देत आहे
त-हाडीसह ,ममाणे , अभानपुर गावांत आणि गावात रहाणाऱ्या नागरिकांना , वीज पुरवठा करणाऱ्या डीपी आणि गावात सह शेतात पसरलेले वीज वाहक तारा या अनेक दशके जीर्ण झाल्यामुळे आयुष्यमान संपले आहे तारा इतक्या खाली आल्या आहे की जमिनीच्या पाच ते सहा फूट उंचीवर आहे शिवाय या भागातील डीपीची अवस्था इतकी भयंकर आहे की या डीपीला फ्युज नाही कव्हर नसलेल्या ऍल्युमिनिअमच्या तारा जोडलेल्या असतात डीपी थ्री फेज वीज येत असते आणि या ठिकाणी तीन फ्युजच्या मधील अंतर दोन ते तीन इंच असते तारा वितळून किंवा वाऱ्याच्या झुळक आली तरी एकमेकांना स्पर्श होऊन विजेचे लोळ पडतात, या ठिकाणी नागरिकांना रात्री अपरात्री येऊन फ्युजची जोडणी करतात, मरणाला सोबत घेऊन फिरणारे गावकरी व शेतकरी देशातील सर्वात मोठे आव्हान स्वीकारत आहे
वीज वितरण कंपनी केवळ बिल वसुलीचा तगादा लावते, बिल थकले की वीज खंडित करते, तर काही गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करते परंतु पैसे वसुल करतांना आपली जबाबदारी आणि जबाबदारीचे भान अधिकारी ठेवत नाही अशी सेवा गावकऱ्यांना मिळत असेल तर गावकरी कसे बिल भरणार असा प्रश्न निर्माण होतो
चौकट
त-हाडी गावात गेले की ट्रान्सफार्मरचे तीन तेरा वाजलेले दिसतात, झाडांच्या गर्दीत आणि जीर्ण झालेल्या तारांच्या खाली फ्युज नसलेल्या डीपीला विद्युत वाहक तारा गुंडाळून वीज पुरवठा सुरु करायचा एवढी मोठी जोखीम नागरिक घेऊन काम करत आहे आणि दुरुस्ती न करता वसुलीचा तगादा लावणारी वीज वितरण कंपनी नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे
एकही वायरमन गावत रहात नाही. सायंकाळी पाच वाजले की मोबाईल बंद करून तालुक्याच्या ठिकाणी राहातात
लोटन भामरे
सामाजिक कार्यकर्त्यां त-हाडी







