तऱ्हाडी माध्यमिक व ज्यू सायन्स कॉलेज येथील खेळाडूची कुस्ती स्पर्धेत जिल्हा स्तरावर निवड
तऱ्हाडी:- धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व शिरपूर तालुका शासकीय क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शिरपूर तालुका शालेय शासकीय कुस्ती क्रीडा स्पर्धा २०२३आज दिनांक २४ ऑगस्ट २०२३ वार गुरुवार तालुका क्रीडा संकुल शिरपूर येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत स्व. अण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय व ज्यु.सायन्स कॉलेज तऱ्हाडी येथील १७ वर्ष आतील मुले कुस्ती (ग्रीक रोमन) यात राजेंद्र जयसिंग पावरा :- ५१ किलो वजन गटात गोपाल पावबा कोळी:- ७१ किलो वजन गटात व १९ वर्षातील मुले कुस्ती (ग्रीक रोमन) यात राहुल संजय वडार:- ६३ किलो वजन गटात खुशाल महेंद्र बडगुजर ६७ किलो वजन गटात सागर शांतीलाल पवार ७२ किलो वजन गटात यांची जिल्हा स्तरावर निवड झाली. यांची निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे व उपाध्यक्ष निंबा नंथू भामरे सचिव विजय भामरे व संचालक मंडळ व मुख्याध्यापक एन.एच.कश्यप. प्राचार्य नितीन पाटील डॉ प्रा.दिलवरसिंग गिरासे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे यांना क्रीडा शिक्षक रावसाहेब चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले…
फोटो –
तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत जिल्हा स्तरावर निवड झाली त्या वेळी शिरपूर तालुका अध्यक्ष मनोज पाटील. उपाध्यक्ष विजय सिसोदे क्रीडा संयोजक प्रा.राधेशाम पाटील व क्रीडा शिक्षक रावसाहेब चव्हाण व विजयी खेळाडू







