कापुस शेतकरी शेतीशाळा माध्यमाने कापुस उत्पादवाढीसाठी मार्गदर्शन
मौजे भटाणे येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे तालुका कृषी अधिकारी शिरपूर सी डी साठे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कापुस पिकावर भटाणे येथे शेतीशाळा घेण्यात आली,राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस पिकाची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना अंतर्गत मौजे तऱ्हाडी,भटाणे, ममाने, शिवारात कापूस पिक प्रात्यक्षिक १०० हेक्टर क्षेत्रावर राबविण्यात येत आहे अंतर्गत कापूस पीक शेतकऱ्यांची शेतीशाळाचे माध्यमाने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी व कापूस उत्पादन वाढ करण्याच्या दृष्टीने
शेतकऱ्यांना विविध उपाय योजना सुचविण्यात आले त्यात श्री बालुदास लोटन पाटील यांच्या कापुस क्षेत्रात वर जाऊन कापूस पीक परिसंस्थेच्या अभ्यास पिकाचे निरीक्षणे घेऊन प्रत्यक्ष कृतीतून पिकावरील नुकसानकारक शत्रू कीड ओळख आणि मित्र किडींची ओळख करणे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन ,कामगंध सापळे , निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, रस शोषणारे किडी मावा, तुडतुडे, फुलकिडे ,पांढरी माशी यांचे नियंत्रण बाबत मार्गदर्शन ,गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन, मका पिकावरील लष्करीअळीचे व्यवस्थापन , एकात्मिक तण व्यवस्थापन, मृद आरोग्य पत्रिका आधारित किंवा जमीन सुपीकता निर्देशांक पीक शिफारस नुसार एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थपन व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार फवारणीद्वारे खते देणे ,ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खतांचा वापर करणे. असे उपाय योजना कृषी सहाय्यक महेंद्र पाटील यांनी सुचविण्यात आले,
पंतप्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवण्यासाठी सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाविषयी माहिती देऊन शेतकरी गटांना व वैयक्तिक लाभासाठी शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसायबाबत , महा डी बी टी पोर्टल विविध अनुदानाचे योजना बाबत अडचणी , पि एम किसान , कृषि विस्तार योजना बाबत. कृषी सहाय्यक महेंद्र पाटील यांनी माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक एन एन महाजन यांनी प्रास्ताविक करून विवीध योजनेविषयी माहिती दिली. सहकार्य श्री. बालुदास लोटान पाटील यांनी त्यांचा कापुस प्लॉट चे व्यवस्थापन बाबत माहिती दिली. गावातील प्रगतशील शेतकरी श्री धनजंय मुरलीधर पाटील यांनी शेती करत असताना पारंपरिक पद्धतिला छेद देऊन, नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंबकरून उत्पादन कसे वाढवता येईल व पिक व्यवस्थापन पिकं पद्धती बाबत शेती करत असताना येणारे अडचणी व त्यावरील उपाय या बाबत सविस्तर मारगदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषि मित्र बिपीन उखा पाटील व कृषि सहायक ललित पाटील यांनी सहकार्य करून उपस्थित सर्व शेतकऱ्यांचे श्री महेंद्र पाटील यानी आभार मानले.







