माळेवाडी साजात तलाठ्यांच्या खुर्चीचा गैरवापर तहसिलदाराच्या आदेशाला केराची टोपली.
माळेवाडी ता.आटपाडी येथील सजाचा कारभार झिरो तलाठ्यांच्या ताब्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचे फोटो व व्हिडिओ शूटिंग वायरल झाले आहे. त्यामुळे महसूल विभागाचा कारभार बेभरवसी असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.तहसिलदार बी . एस . माने यांनी 21/06/2023 रोजी मंडळ अधिकारी व गावकामगार तलाठी यांनी कामासाठी खाजगी उमेदवार ठेऊ नयेत ,तसे आढळल्यास व अनुचित प्रकार घडल्यास मंडळ अधिकारी व तलाठी यांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल व मंडळ अधिकारी व गावकमगार तलाठी यांनी मुख्यलयाच्या ठीकाणी रहावे असे आदेश काढले होते.
परंतु या आदेशाला गाव कामगार तलाठी व मंडळ अधिकारी यांनी केराची टोपली दाखवलेली दिसून येत आहे.असाच प्रकार माळेवाडी ता. आटपाडी येथे घडला आहे तलाठी यांच्या खुर्चीवर खाजगी कर्मचारी बसून काम करताना पाहावयास मिळत आहे.
याचे शुटींग व फोटो व्हायला झाले आहेत.तालुक्यतील सर्वच तलाठी कार्यालयात खाजगी उमेदवार काम करताना आढळून येत असून खाजगी उमेदवाराकडून शेतकऱ्यांची लूट होत आहे.
तसेच सर्व सामान्य जनतेला त्रासाला सामोरे जावे लागत आहे .तहसिलदार यांच्या आदेशाला गाव कामगार तलाठी व मंडळ अधिकारी यांनी केराची टोपली दाखवली असल्याचे स्पष्ट झाले आहे.याचे ज्वलंत उदाहरण पाहता माळेवाडी सजा असूनही हे कार्यालय करगणी येथे चालू आहे .
त्याच बरोबर या कार्यालयात खाजगी उमेदार काम करताना आढळून आले आहेत मग आत्ता वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का ? किंवा अशा अधिकाऱ्याची पाठराखण करणार याकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे .फोटो – गाव कामगार यांची खुर्ची खाजगी कामगारांनी बळकवली.







