• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने त-हाडी परिसरातील शेतकरी हैराण वरुळ सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा ठिय्या उपाय योजना न झाल्यास तीव्र आंदोलनत-

माणगंगा by माणगंगा
September 1, 2023
in महाराष्ट्र
0
वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने त-हाडी परिसरातील शेतकरी हैराण वरुळ सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा ठिय्या उपाय योजना न झाल्यास तीव्र आंदोलनत-

वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने त-हाडी परिसरातील शेतकरी हैराण वरुळ सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा ठिय्या उपाय योजना न झाल्यास तीव्र आंदोलनत-

हाडी :- शिरपूर तालुक्यातील त-हाडी सह परिसरात गेल्या काही महिन्यांपासून कृषी तसेच गावठाणचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. विजेअभावी पिकांना पाणी देणे शक्य होत नसल्यामुळे पीके करपू लागली आहेत.

विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची वारंवार मागणी करूनही विजेची समस्या सुटत नसल्यामुळे अखेर दिनांक १ सप्टेंबर २३रोजी निवेदन देत संतप्त शेतकऱ्यांनी सबस्टेशन गाठून वीज विभागाच्या उदासीन धोरणाविषयी रोष व्यक्त केला. विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिला.त-हाडी सह परिसरातील जनतेची व शेतकऱ्यांची विजेची समस्या कायमस्वरूपी सुटावी वरुळ येथे ३३ के.व्ही.क्षमतेच्या उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली. या उपकेंद्रावरून परिसरातील त-हाडीसह वरुळ भटाणे जवखेडा त-हाडकसबे भामपुर, टेकवाडे नवे -जुने अंतुली नवे-जुने लोढरे अभानपुर जळोद, ममाणे आदि गावांच्या गावठाण व कृषी क्षेत्रा करिता विद्युत पुरवठा केला जातो.मात्र गेल्या काही महिन्यांपासून विद्युत पुरवठ्यात सातत्याने बिघाड होत आहे.

परिणामी दिवसा तसेच रात्रीतून होणारा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने घरगुती तसेच कृषी क्षेत्रातील ग्राहक अक्षरशः वैतागले आहेत. विशेष म्हणजे विजेचा लपंडावाचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसला आहे. वास्तविक कृषी क्षेत्राच्या शेड्युलनुसार दररोज किमान आठ तास विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे गरजेचे आहे. असे असताना झिरो लोड सेटिंग च्या नावाने दिवस-रात्र पाळीतून केवळ तीन ते चार तास विद्युत पुरवठा होत आहे. त्यातही वेळोवेळी व्यत्यय येत असल्याने पिकांना पाणी देतांना शेतकरी हतबल झाले आहेत गेल्या महिन्याभरापासून परिसरात दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे पिके करपू लागली असताना त्यात अपुऱ्या विजेच्या पुरवठ्याने भरचं घातली आहे. त्यामुळे पिकांना कसे वाचविण्याचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे. दरम्यान आधीच गेल्या वर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना यावर्षी तरी चांगले उत्पादन येईल व आर्थिक नुकसान भरून निघेल अशी आशा होती.

मात्र पावसाने दिलेल्या ताण आणि विजेच्या अपुरा पुरवठा यामुळे पुन्हा आपले पीक हातातून जाईल व आपण कर्जबाजारी होऊ अशी भीती शेतकरी वर्गाला वाटू लागली आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जाऊ नये यासाठी विद्युत पुरवठा सुरळीत होणे आवश्यक आहे. यासंदर्भात त-हाडी परिसरातील शेतकऱ्यांनी वारंवार वीज विभागाकडे मागणी ही केली होती मात्र शेतकऱ्यांच्या या मागणीकडे संबंधितांकडून कानाडोळा झाल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात येत आहे

अखेर १ सप्टेंबर २३रोजी त-हाडी वरुळ भटाणे जवखेडा त-हाडकसबे अभानपुर जळोद, ममाणे भामपुर टेकवाडे नवे -जुने लोढरे नवे -जुने अंतुली परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी वरुळ येथील वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता दिनेश माळी यांना भेटून वारंवार वीज पुरवठा खंडित होणे संदर्भात चर्चा करून मागणी केली कृषी क्षेत्रासाठी रोज आठ तास सुरळीत वीज पुरवठा व्हावा मागणीसाठी यावेळी विजेची समस्या कायमस्वरूपी न सुटल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपस्थित शेतकऱ्यांकडून देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य भिमराव ईशी, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य शिवाजी धनगर, माजी उपसरपंच ओंकार पाटील, जवखेडा सरपंच कैलास पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील, विशाल कंरके, लक्ष्मण पाटील, संजय जाधव, योगेश पाटील छोटु पाटील, परिसरातीलशेतकरी यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

चौकट
पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे पिकं करपू लागली आहेत शेतकऱ्यांच्या कूपनलिकेची पातळी खालावली असल्याने थोडेफार शिल्लक असलेल्या पिकांना देण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रयत्न आहेत विजेअभावी पिकांना पुरेशा पाणी देता येत नसल्याने मोठ्या जोमाने उभे राहिलेले पिक हातातून गेली तर मोठा आर्थिक फटका बसेल आणि शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होईल.यासाठी तात्काळ उपाययोजना व्हावी ,अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडणार.
भिमराव ईशी
जिल्हा परिषद सदस्य धुळे

दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली बळीराजा पूर्णतः हातबल झाला आहे थोडेफार पाणी बोरवेल मध्ये शिल्लक असल्याने पीक वाचवण्याच्या प्रयत्नात आहे झिरो लोड सेटिंग च्या नावाने वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा वारंवार खंडित करण्यात येतो आणि गुजरात सह आंध्रप्रदेशात नियमित शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा देण्यात येतो मग महाराष्ट्रात का नाही ? वीज वितरण कंपनीने तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल
(ओंकार पाटील) माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य व शेतकरी

अत्यल्प पावसामुळे वरच्या लेव्हलवरून वीज निर्मिती कमी झाली व खालच्या लेव्हलवर विजेची मागणी जास्त आहे त्यामुळे बॅलन्स बरोबरीने होत नसल्याने तो समतोल राहावा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात विजेच्या तुटवडा असल्याने इमर्जन्सी लोड सेटिंग करण्यात येत आहे

(दिनेश माळी) अभियंता
वरुळ वीज वितरण केंद्र

Views: 144
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
अखेर रोकडे गावाचा त्या रस्त्याचे प्रश्न मार्गी

अखेर रोकडे गावाचा त्या रस्त्याचे प्रश्न मार्गी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)