कोंढावळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात संस्कार कथा वाचन —————
तऱ्हाडी संपादक —–
शहादा तालुक्यातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय शाळेत श्रावण महिन्यात जसे शास्र वाचन करतात त्या प्रमाणे विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार रुजावेत म्हणून ‘श्यामची आई’या पुस्तकाचे वाचन पूर्ण महिन्याभर उपशिक्षक जीं.डी.वाल्हे व वाय.एस.शिंपी या शिक्षकांनी रोज शाळेच्या शेवटच्या 20 मिनटं रोज एक किंवा दोन रात्र वाचन करून विद्यार्थांमध्ये संस्कार रुजावेत म्हणून मेहनत घेतली.
जीवन सुंदर जगण्याचे विचार मुलांमध्ये कसे येतील त्यासाठी साने गुरुजींचे विचार पुस्तक वाचण्याच्या माध्यमातून मांडले. या कार्यमासाठी शाळेचे मुख्याध्यापक जे.पी.माळी,उपशिक्षक डी.एस.जगताप,आर.एच.खैरनार,पी.टी.परदेशीं,वाय.एस.शिंपी,के.एस्.सैंदाणे,एस.पी.सोनवणे,एम.एम.माळी तसेच शिकेत्तर कर्मचारी आर.डी.माळी,आर.एम.बागुल,एस.डि.बैसाणे सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले.






