दर वाढले : दुष्काळामुळे उत्साहावर काहीसे विरजण
शेतकऱ्यांच्या बैलपोळ्यालाही महागाईचा चटका
त-हाडी प्रतिनिधी शेतकऱ्यांबरोबर बारा महिने शेतात राबणारा शेतकऱ्यांचा खरा मित्र बैल. या मित्राच्या ऋणातून मुक्त होण्याचा सण म्हणजे पोळा. मात्र आता यांत्रिक शेतीने सर्जा जोडीचा वापर अत्यल्प प्रमाणात होत असल्याने ही संख्या रोडावली असली तरी यंदा पावसाच्या आगमनाने बैलपोळ्यासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे.
कृषी व्यवसायात दिवसेंदिवस मनुष्य बाळाचे अत्यल्प होत आहे. त्याबरोबरच नैसर्गिक तसेच शासकीय अवकृपेमुळे शेती बेभरवशाची होऊन बैलांचे संगोपन करणे सोपे राहिले नाही. पशू संगोपनासाठी दिवसेंदिवस दुर्मीळ होत चाललेला चारा, वैरणाच्या गगनाला भिडलेल्या किमतीमुळे बैलाकडून शेती करून घेणे अशक्यप्राय होत चालले आहे. चाळीस वर्षांपूर्वी ज्या शेतकऱ्याकडे वीस पंचवीस बैलांची जोडी होती, त्यांच्याकडे आता एक बैल देखील पहावयास मिळत नाही.
एरवी बैल पोळ्याच्या सणाच्या दिवशी बैलांना पूर्णपणे सुटी असायची. आदल्या दिवशीच पोळ्यासाठी त्यांना भरपूर प्रमाणात हिरवे गवत उपलब्ध करून ठेवले जायचे. सकाळी बैलांना नदीवर अथवा पाटावरील पाण्यात सचिन धुऊन स्वच्छ केले जायचे स्वच्छ झालेल्या बैलांच्या रंगविले जायचे. संध्याकाळी सर्व बैलांची एकत्र मिरवणूक काढून त्यांचे औक्षण करून बैलांना पुरणपोळी भरवली जात. आता मात्र या उत्सवाचे स्वरूप बदलत चालले असून, बैलांची कमी होत असलेली संख्या, महागाईचा फटका सण-उत्सवाला बसू लागला आहे.
असे आहेत साहित्याचे दर
माटुट जोड १५० ते २०० रुपये नग
मोरकी ५० ते १६० रुपये एक नग
रेशम कासरा १२० रुपये ते ४०० रुपये पर्यंत
पितळी तोडे १००० रुपये किलो
पितळी घोगर १००० ते १२५० रुपये किलो –
पितळी घंटी ८०० ते १००० रुपये किलो
पितळी घुंगरु १२०० ते १४०० रुपये किलो
हिंगुळ डबा ५० ते ७० रुपये पर्यंत
गंडे – ४० ते २०० रुपये पर्यंत
गतवर्षीच्या तुलनेने किमतीत २० टक्के झाली वाढ
बैलपोळ्याच्या सणासाठीच्या व्यापारातील आमची तिसरी पिढी आहे. पूर्वी पितळेच्या वस्तूंची तीन टन मालाची विक्री व्हायची. आता मात्र पाचशे किलोवर आली आहे. बैल पोळ्यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमतीतही गतवर्षीच्या २० टक्के वाढ झाली आहे. परिणामी व्यवसायांवर मंदीचे मळभ आहे.







