जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या कक्षाची तोडफोड करणाराचा बचेरी सरपंच राणी गोरड यांच्या कडुन जाहीर निषेध
विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधी-
सोलापुर जिल्हा परिषद येथील मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा ताई आव्हाळे मॅडम यांच्या कक्षाची काही लोकांनी तोडफोड केली हे सोशल मीडियातुन पाहिल्यानंतर बचेरी गावाच्या महिला सरपंच राणी विश्वजीत गोरड यांनी तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
आमची भगिणी सोलापुर जिल्ह्याचा कारभार पाहते हे मी एक महिला म्हणुन मला अभिमानास्पद असुन अशा प्रकारचा एक महिलेच्या कक्षाची तोड फोड करणे अतिशय निंदणीय असल्याचे प्रतिपादन बचेरी गावच्या कर्तव्यदक्ष सरपंच राणी विश्वजीत गोरड यांनी सांगितले.
महिलांनी चुल आणि मुल यापुरते मर्यादित न राहता महिलांनी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर राष्ट्रपती पदापर्यत मजल मारली व ते पद यशस्वीपणे सांभाळले यांचे उदाहरण म्हणजे भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील हे आहे.
प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना महिलांना अशा प्रकारच्या विचार विकृत घडामोंडीना तोंड द्यावे लागत आहे तरी सरकारने कडक पाऊले उचलावीत अशी विनंती सरपंच राणी गोरड दै जनमत शी बोलताना सांगितले. एक सक्षम ,जबाबदार महिला अधिकारी म्हणुन आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा ताई यांच्या सोबत असुन लवकरच त्यांना भेटुन धीर देणार असल्याचे सरपंच राणी विश्वजीत गोरड यांनी सांगितले







