समाजसेवक सुमित पंडित व समाजसेविका सौ.पुजा पंडित यांना संत सेना महाराज समाजरत्न पुरस्कार जाहीर
…………………………………………………………….
समाजसेवक सुमित पंडित व समाजसेविका पुजा पंडित यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ते करीत असलेल्या रजंल्या गांजल्याची सेवा खरचं समाजापुढे वाखाडण्याजोगी आहे, रस्तावर फिरणाऱ्या मनोरुग्णांची दाढी केस कापून स्वच्छ अंघोळ घालुन त्यांना मनोविकृती रुग्णालयात दाखल करतात, गरजु रुग्णांना अर्ध्या रात्री मेडिकल साहित्य, भोजन, रक्त, पुरविण्यात ही जोडी देवदुतासारखी मदतीला धावुन जाते, बेवारसांचे अत्यंविधी सुध्दा हे दापत्य माणुसकी समुहाच्या माध्यमातून करतात, पुजा पंडीत सध्या संभाजीनगर (औरंगाबाद) येथे वृध्दाश्रम चालवतात , येथे माणुसकी वृध्द सेवालय देखील वृध्दाच्या सेवेसाठी मदतकार्य करते, म्हणूनच त्याच्या या सामाजिक कार्याची दखल घेत, सन्मानित करण्यात येणार आहे, सर्व मान्मानिय सत्कार मुर्ती ना कळवण्यात आनंद होत आहे.
श्री संत सेना बहुद्देशिय संस्था जामनेर व जामनेर तालुका नाभीक समाज मंडळ यांच्या तर्फे संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्ताने विवीध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे,
हा सोहळा जामनेर येथे दिनांक ११-९-२०२३ रोजी आयोजीत करण्यात आला आहे, या कार्यक्रमाचे आयोजक.अध्यक्ष चंद्रकांत शिंदे जिल्हाध्यक्ष जळगाव वसंतराव साळुंके शहराध्यक्ष जामनेर, व संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव समिती यांनी पुरस्कार जाहीर झाल्याचे निवड समितीतर्फे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
ह्या पुरस्कारामुळे समाजात सुमित पंडीत व सौ पुजा सुमित पंडीत यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.







