त-हाडी येथे पोळा सणाच्या निमित्ताने बैलजोडी सजावट स्पर्धा, विजेत्यांचा झाला सत्कार
त-हाडी :-येथील
सामाजिक कार्यकर्ते व पिक संरक्षण सोसायटी माजी व्हा चेअरमन विशाल कंरके यांच्या वतीने पोळ्याच्या दिवशी बैल सजावट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रगतिशील शेतकरी सुरेश शांतीलाल भामरे यांच्या बैलजोडीने पटकावला.
तर रावसाहेब निंबा भामरे व राहुल शांतीलाल धनगर या शेतकऱ्यांच्या बैल जोडीने अनुक्रमे द्वितीय व हितेश पारधी व बाबुराव भिका अहिरे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. बैलजोडी मालकाचा रोख बक्षीस व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५०१, ३०१ व २५१,२०१, रुपयांचे रोख बक्षीस व सन्मानपत्रे देण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमा हे प्रसंगीआदी उपस्थित होते रावसाहेब चव्हाण, यांनी प्रास्ताविक केले.तर डॉ प्रा दिलवरसिंग गिरासे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेतील प्रत्येक शेतकऱ्याला बक्षीस स्पर्धेत सहभागी झालेल्या उर्वरित शेतकयांच्या सजावट केलेल्या बैलजोडींना प्रत्येकी शंभर रुपयांचे बक्षीस दिले. सामाजिक कार्यकर्ते व माजी व्हा चेअरमन विशाल कंरके व कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर चे माजी संचालक ओंकार दशरथ पाटील यांच्या हस्ते रोख बक्षीस देऊन शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला या स्पर्धेचे निरीक्षक म्हणून रावसाहेब चव्हाण व प्रा.दिलवरसिंग गिरासे अशोक वानखेडे महेंद्र खोंडे, ज्ञानेश्वर भामरे, प्रविण शिंदे यांनी कामकाज केले







