इंजी.अनिता पाटील उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सन्मानित
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी ता. आटपाडी येथील इंजिनिअर अनिता पाटील यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभियंता दिनानिमि सांगली जिल्हा स्थापत्य अभियंता संघटना यांच्या वतीने अभियंता दिन साजरा करण्यात आला .
यावेळी अनिता पाटील यांच्या बांधकाम विभागातील उत्कृष्ट कामाबद्दल त्यांनाउत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.,
त्यांनी आत्तापर्यंत हजारो घरांचे RCC Design च्या माध्यमातून व Estimate तसेच construction क्षेत्रात तसेच राजकीय सामाजिक काम सांभाळून व्यावसायिक जीवनात तितक्याच जोमाने काम केले .
यामध्ये त्यांचे पती इंजिनिअर विजय पाटील यांची साथ सदैव त्यांच्या सोबत असते..
महिला असून सुद्धा बांधकाम विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याची पोहोच पावती आज अभियंता दिनानिमित्त अनिता पाटील यांना मिळाली. या मिळालेल्या पुरस्काराबद्दल अनिता पाटील यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले व पुढील काळामध्ये असाच सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहु द्या अशा भावना व्यक्त केल्या.







