दिघंचीत तालुका स्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा उत्साहात……..
आटपाडी प्रतिनिधी
दिघंची ता.येथे आटपाडी तालुका शालेय 2023-24 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शिवाजी बनकर स्पोर्ट्स क्लब दिघंची यांनी केले होते. या स्पर्धेचे आयोजक अमोल वसेकर यांनी क्रीडा संकुल दिघंची या ठिकाणी केले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन आटपाडी तालुका क्रीडा समन्वयक जी. एस. शिंदे व सांगली जिल्ह्यातील नामवंत वकील अॅडव्होकेट अजित वसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. 12 सप्टेंबर या दिवशी क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत 14 वर्षाखालील 8 संघाने व 17 वर्षाखालील 14 संघांनी आणि 19 वर्षाखालील 6 संघानी म्हणजेच तब्बल एकूण 28 संघांनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी दिघंचीतील सामाजिक कार्यकर्ते संदीप शिंदे व हॉटेल सावली चे मालक संभाजी ढोक, आटपाडी तालुक्यातील सर्व संघाचे व्यवस्थापक व क्रीडा शिक्षक उपस्थित होते.







