सामाजिक सलोखा राखूनच गणेश उत्सव साजरा करावा : पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर,
त-हाडी प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील त-हाडी सह परिसरातील समाजात तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींच्या विरोधात लोकप्रतिनिधींनी राजकीय संघर्ष केला पाहिजे. आपल्या गावामध्ये सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी तुमच्यासारख्या तरुण पिढीने हिंदू-मुस्लिम भेदभाव न ठेवता एकमेकांशी प्रेमाने व आदराने वागून एकमेकांचे सण उत्सवात साजरे केले पाहिजेत, असे शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर यांनी त-हाडी वरुळ भटाणे जवखेडा सह परिसरातील गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना व गणपती उत्सव आयोजित कार्यक्रमातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
आज शनिवार रोजी दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजी गणपती विसर्जन व
त-हाडी परिसरात वरुळ भटाणे जवखेडा त-हाडकसबे अभानपुर जळोद ममाणे भामपुर नवे -जुने लोढरे नवे -जुने अंतुली येथे दरवर्षीप्रमाणे गणपती उत्सवच्या निघत असलेल्या मिरवणुकी संदर्भात संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना जातीय सलोखा राखण्याची व कायद्याचे पालन करून आपले सण उत्सव साजरे करण्याचे आवाहन करण्यासाठी पोलिस निरीक्षक अंसाराम आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त-हाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी करून त-हाडी परिसरातील पदाधिकाऱ्यांना व कार्यकत्यांना डीजे, डॉल्बी न लावता व आपल्यामुळे इतर लोकांना नाहक त्रास होऊ नये याची काळजी घेऊनच पारंपारिक वाद्याचा उपयोग करून मिरवणुकी काढाव्यात व कोणतेही अनुसूचित प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी. असे आवाहन पोलिस निरीक्षक अंसाराम आगरकर यांनी केले आहे.
यावेळी पीएसआय छाया पाटील सरपंच जयश्री धनगर. उपसरपंच उजनबाई अहिरे . पोलिस पाटील प्रतापसिंह गिरासे,, तंटामुक्त अध्यक्ष तुळशीराम भामरे, उपाध्यक्ष युवराज भलकार, ग्रामपंचायत सदस्य किरण भलकार . मल्हार सेना उपाध्यक्ष सुनिल धनगर माजी सरपंच सुदाम भलकार, माजी उपसरपंच ओंकार पाटील, तापी परीसर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे
माजी व्हा चेअरमन विशाल कंरके विविध कार्यकारी सहकारी सोसायटी माजी चेअरमन संजय जाधव मराठा कुणबी पाटील बहुउद्देश संस्था अध्यक्ष.रावसाहेब चव्हाण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो –







