सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी गणपती मंडळांनी पुढाकार घ्यावा-सरपंच राणी गोरड
विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधी-
काल पासुन देशात गणरायाचे धुम धडाक्यात आगमन झाले. यंदाच्या गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट असल्यामुळे कही खुशी कही गम अशी परिस्थिती बळीराजाची झाली. पिलीव भागातील विविध मंडळांनी डान्स स्पर्धा,ढोल ताशे अशा प्रकारचे उपक्रम राबवुन आपले मंडळ कसे चर्चैत राहील यासाठी जोरदार तयारी चालु केली आहे.
बचेरी गावातही वाड्या वस्तीवर लहान मोठे मंडळे स्थापन झाली आहेत याबाबत अष्टविनायक गोरडवस्ती मंडळाच्या सर्वेसर्वा व बचेरी गावच्या कर्तव्यदक्ष सरपंच राणी विश्वजीत गोरड यांनी मंडळाचे देणगी स्वरुपाचे पैसे काटकसरीने वापरुन शिल्लक पैशातुन वाडी वस्तीवरील गावात पायी चालत जाणार्या विद्यार्थ्यांना सायकल खरेदी करण्याचा अभिनव संकल्प तयार केला आहे.
गावातील इतरही मंडळानी गरजुंना धान्य वाटप,शालेय साहित्य वाटप ,झाडे लावणे,मुली वाचवा अभियान राबवणे अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे अव्हान सरपंच सौ राणी विश्वजीत गोरड यांनी केले. हिंदु संस्कृतीत गणेश उत्सवाला फार महत्त्व आहे ही परंपरा पिढ्यान पिढ्या मोठ्या आनंदात, उत्साहात पार पडली पाहिजे.
गावातील मंडळांना आर्थिक किंवा शारीरिक रुपाने ग्रामस्थांनी सहकार्य केले पाहिजे कारण सार्वजनिक काम एक दोन लोकं करु शकत नसतात त्या भागातील युवकांना जेष्ठांनी प्रोत्साहित केले पाहिजे.







