तऱ्हाडी विद्यालयात गो-सेवा धाम ॲनिमल रेस्क्यू फोर्स सेवाभावी संस्था शिरपूर यांच्या वतीने आपल्या परीसरात आढळणारे साप बद्दल मार्गदर्शन
तऱ्हाडी:-येथील आण्णासाहेब साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर सायन्स कॉलेज येथे गो-सेवा धाम ॲनिमल रेस्क्यू फोर्स सेवाभावी संस्था शिरपूर यांच्या वतीने आपल्या परीसरात आढळणारे साप बद्दल मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलीस पाटील प्रतापसिंग गिरासे होते यावेळी शिरपूर तालुका शेतकरी संघर्ष स़ंघटनेचे उपाध्यक्ष तुळशीराम भामरे तापी परीसर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे मुख्याध्यापक एन एच कश्यप प्राचार्य नितीन पाटील सर्पमित्र दिनेश गिरासे व बाबा थोरात अनिकेत कोळी व राहुल धनगर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला सर्पमित्र बाबा थोरात यांनी आपल्या परीसरात आढळणारे साप ते विषारी साप नीम विषारी साप व बिनविषारी साप कसा ओळखावा व त्याबद्दल व सर्पदंश झाल्यास त्यांची लक्षणे सर्प चावल्यास काय करावे काय करू नये याविषयी पोस्टर प्रदर्शन व्दारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सर्प शेतकऱ्यांचा मित्र कसा आहे
हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा शिक्षक रावसाहेब चव्हाण यांनी केले होते







