खर्दे विद्यालयात स्व. पप्पाजींना विनम्र अभिवादन….
तालुक्यातील खर्दे बु. येथील आर.सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे आश्रयदाते स्व. रसिकलाल चुनीलाल पटेल यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
सुरुवातीला स्वर्गीय पप्पाजींच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य पी. व्ही. पाटील होते. पप्पाजींच्या समाजोपयोगी कार्याविषयी अमोल सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे प्राचार्य यांनी स्व. पप्पाजींच्या दातृत्व कर्तृत्वाविषयी विद्यार्थ्यांना ओळख करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए .जे. पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती मनीषा पाटील यांनी केले.
आदरांजली कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य पी. व्ही. पाटील, पी. एस. अटकाळे, वाय. डी. मीठभाकरे, ए. एम. सोनवणे,ए.जे. पाटील, डी. एम. पवार, डी.डी. जाधव, बी. एस. पावरा,, श्रीमती एस .आर .निकम ,श्रीमती एम. एन .पाटील, श्रीमती वर्षा पाटील व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.







