जि प शाळा फत्तेपूर (फॉ) येथे स्काऊट गाईड गणवेश वाटप
त-हाडी वार्ताहर : –
जिल्हा परिषद शाळा फत्तेपुर फॉरेस्ट येथे समग्र शिक्षा अभियानाच्या निधीतून शालेय व्यवस्थापन समितीने निर्धारीत करून दिलेल्या रंगानुसार शालेय गणवेशाचे वाटप प्रथम टप्प्यात संपन्न झालेले आहे
दुसऱ्या टप्प्यात समग्र शिक्षा अभियानाच्या निधीतून शाळेतील १५२ विद्यार्थ्यांना स्काऊट व गाईडचा शालेय गणवेश वाटप करण्यात आला . शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ‘मोफत गणवेश योजनेच्या ‘ निर्णयानुसार स्काऊट व गाईड च्या एका गणवेशाचे वाटप शालेय
व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश चव्हाण व मुख्याध्यापक, प्रकाश भामरे यांच्या हस्ते व करण्यात आले. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता . एकाच रंगातील मुलांनी परिधान केलेला ड्रेस सर्वांचे लक्ष वेधून घेत होता .
स्काऊट व गाईड या विषयास अनुसरून एक समान रंगाचा गणवेश, बूट व दोन पाय मोजे जोडी देण्यात आलेले आहे . ‘स्काऊट व गाईड शिक्षणाची’ संस्कार क्षमता विचारात घेऊन राज्यातील शाळांमध्ये स्काऊट व गाईड या विषयाचा समावेश करण्यात येणार आहे . सदर स्काऊट व गाईड विषयाच्या शिक्षणासाठी वेगळा गणवेश निर्धारित करून देण्यात आलेला आहे . स्काऊट व गाईड या विषयाच्या आठवड्यातून दोन तासिका संपन्न होणार आहेत . त्यापैकी मंगळवार, गुरुवार व शनिवार या तीन दिवशी विद्यार्थ्यांनी स्काऊट व गाईडच्या विषयास अनुरूप आकाशी रंगाचा गणवेश परिधान करणे आवश्यक राहील व सोमवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवशी शालेय व्यवस्थापन समितीने निर्धारीत करून दिलेला गणवेश परिधान करावा .
कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश चव्हाण तसेच मुख्याध्यापक प्रकाश भामरे स लुकेश गावित, कृष्णा अहिरे , दिलीप पाडवी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
फोटो -जिल्हा परिषद मराठी शाळा फत्तेपूर फॉ येथे विद्यार्थीना गणवेश वाटप करताना शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश चव्हाण, मुख्याध्यापक प्रकाश भामरे, शिक्षक शिक्षिका उपस्थित आहेत







