शिक्षक बँकेची सभा उत्साहात, शांततेत संपन्न.आटपाडीच्या “अंडी टोळीवर” कारवाई होणार……….
आटपाडी प्रतिनिधीसांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या 71व्या सर्वसाधारण सभेत अस्तित्वहीन आणि वैफल्यग्रस्त विरोधक झालेले दिसून आले. शिक्षक बँकेच्या इतिहासात सर्वप्रथम महिलांनी पहिल्यांदा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कधी नव्हे तेवढी अतिशय शांततेत सभा जवळजवळ दीड तास चालली होती. उपस्थित सभासदांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सभेमध्ये आदरणीय चेअरमन यांचे वतीने दिले गेले. असे असताना आपले काहीच चालत नाही हे ओळखुन स्टंट दाखवण्याच्या प्रयत्नात आटपाडीच्या शिक्षक समितीच्या “अंडी टोळीने” स्टेजच्या दिशेने 2 अंडी भिरकावली. ज्यामध्ये आटपाडी शिक्षक समितीतील काही शिक्षकांची नावे समोर आली आहेत..
ज्यांनी हे कृत्य केले ते अतिशय निंदनीय असून शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे कृत्य केले आहे.विरोध हा लोकशाही पद्धतीने नोंदवला पाहिजे परंतु नैराश्याने बेभान झालेले काहीही करत सुटले आहेत. असे दुष्कृत्य करणाऱ्या वर निश्चित कायदेशीर कडक कारवाई होईलच व त्यांचे सभासदत्व ही बँकेच्या वतीने रद्द करण्यात येईल. अशी माहिती आटपाडीचे संचालक शरद चव्हाण यांनी दिली.







